जैन धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जैन धर्म
JainismSymbol.PNG
This article is part of a series on जैन धर्म
प्रार्थना आणि प्रतिज्ञा
नवकार मंत्र · अहिंसा ·
ब्रम्हचर्य · सत्य · निर्वाण ·
अस्तेय · अपरिग्रह · अनेकान्तवाद
कळीच्या संकल्पना
केवलज्ञान · त्रैलोक्यविज्ञान · संसार ·
कर्म · धर्म · [[मोक्ष|]] ·
गुणस्थान · नवतत्व
प्रमुख व्यक्ती
२४ तिर्थंकर · रिषभ ·
महावीर · आचार्य  · गंगाधर ·
सिद्धसेन दिवाकर · हरीभद्र
क्षेत्रानुसार जैन धर्म
भारत · पाश्चिमात्य
पंथ
श्वेतांबर · दिगांबर · तेरापंथी ·
Early Jainist schools · स्थानकवास ·
बिसापंथ · डेरावासी
मजकूर
कल्पसूत्र · Agama ·
Tattvartha Sutra · सन्मती प्रकरण
इतर
Timeline · विषयांची यादी
ब्रीदवाक्य
Parasparopagraho Jīvānām[मराठी शब्द सुचवा]
या साचाचे संपादन
(संपादन · बदल)

जैन धर्म दालन
 v • d • e 

जैन धर्मातील तत्त्वे[संपादन]

 • जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव,मनुष्य, पक्षी,पशु इ. विविध जन्म घेतो.
 • अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म,आकाश,पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत.अजीव हे चैतन्यविरहित आहे.जीव व पाच प्रकारचे मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
 • पाप-पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य,इ.चांगले फळ मिळवून देणारा कर्म समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्य विपरीत असा कर्मसमुदाय त्याची ८२ कारणे आहेत.त्यांनाच 'आश्रव' असे नाव आहे.
 • ज्ञान-जैन तत्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते.परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
 • स्यादवाद - एखाद्या वस्तुसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो.हा सिद्धांत सप्तभंगी सिद्धांत म्हणून ओळखला जातो.

आहिसा या पर्मो धर्म हा मुख नियम या धर्मथ मन्ल जात आहे सदच्हर

 • (अ) स्यादस्ति = शक्य आहे, की ते आहे,
 • (ब)स्यान्नास्ति = शक्य आहे, की ते नाही,
 • (क) स्यादस्ति च नास्ति च = शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
 • (ड) स्यादव्यक्तव्यम् = शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
 • (इ) स्यादस्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
 • (ई) स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
 • (उ) स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च = शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.


पंचमहाव्रते[संपादन]

 • सत्य - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
 • अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, वचन, काया द्वारे हत्या करू नये.
 • अस्तेय - अस्तेय म्हणजे चोरी करू नये.
 • अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा.
 • ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.

तीन गुणव्रते[संपादन]

 • दिग्व्रत -
 • कालाव्रत -
 • अनर्थदंडव्रत

चार शिक्षाव्रते[संपादन]

 • सामायिक
 • प्रोषधोपवास
 • भोगोपभोग परिणाम
 • अतिथी संविभाग

जैन धर्मातील पंथ[संपादन]

 • दिगंबर पंथ -
 • श्वेतांबर पंथ -

तीर्थकार[संपादन]

जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थकार होऊन गेले त्यांची नावे -

 • श्री वृषभनाथ भगवान
 • श्री अजितनाथ भगवान
 • श्री संभवनाथ भगवान
 • श्री अभिनंद भगवान
 • श्री सुमतिनाथ भगवान
 • श्री पद्मप्रभ भगवान
 • श्री सुपार्श्वनाथ भगवान
 • श्री चंद्रप्रभ भगवान
 • श्री पुष्पदंत भगवान
 • श्री शीतलनाथ भगवान
 • श्री श्रेयांसनाथ भगवान
 • श्री वासुपूज्य भगवान
 • श्री विमलनाथ भगवान
 • श्री अनंतनाथ भगवान
 • श्री धर्मनाथ भगवान
 • श्री शांतीनाथ भगवान
 • श्री कुन्थुनाथ भगवान
 • श्री अरहनाथ भगवान
 • श्री मल्लीनाथ भगवान
 • श्री मुनिसुव्रतनाथ भगवान
 • श्री नमीनाथ भगवान
 • श्री नेमीनाथ भगवान
 • श्री पाश्वनार्थनाथ भगवान
 • श्री वर्धमान महावीर भगवान

जैन - दुररांना तरारून कही न करणे हा तत्व आहे . जीव ला दुखावणे .