Jump to content

स्पेस शटल कोलंबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
210px
स्पेस शटल कोलंबिया

स्पेस शटल कोलंबिया

प्रकार स्पेस शटल
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोइंग
पहिले उड्डाण १२ एप्रिल १९८१ - १४ एप्रिल १९८१
समावेश २६ जुलै १९७३
निवृत्ती १ फेब्रुवारी २००३ ला उद्ध्वस्त
सद्यस्थिती १ फेब्रुवारी २००३ ला मोहिमेहुन परतताना उद्ध्वस्त
मुख्य उपभोक्ता नासा

स्पेस शटल कोलंबिया हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. इ.स. २००३ मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला. यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला सहीत सात अंतराळयात्री मृत्युमुखी पडले होते. या पुर्वी यानाने अट्ठावीस अंतराळ मोहिमा केल्या होत्या.

यानाचे पहिले उड्डाण एप्रिल १२ इ.स. १९८१ मध्ये झाले. हे निर्मनुष्य होते. पहिले अंतराळवीरांसहितचे उड्डाण नोव्हेंबर ११ इ.स. १९८२ रोजी झाले. या काळातच चॅलेंजर हे अंतराळयानही बांधणी होऊन पूर्ण झाले होते.

रचना

[संपादन]
कोलंबिया अंतराळयान

कोलंबिया या यानाची बांधणी इ.स. १९७५ मध्ये सुरू झाली. हे एकच असे यान होते की ज्या मध्ये कार्बन असलेल्या आवरणाचा उपयोग उष्णतेचे नियमन करण्यासाठी केला गेला होता. हे आवरण पंखांवर बसवले गेले होते. याला Space shuttle thermal protection system असे नाव दिले गेले होते. पुनर्बांधणीमध्ये या यानावर अजून तापमान प्रतिबंधक आवरणे लावण्यात आली. या यानाच्या मुळ आराखड्यानुसार डाव्या पंखावर अमेरिकेचा झेंडा रंगवलेला होता आणि यु एस अ अशी अक्षरे उजव्या पंखावर होती. नंतर ती बदलण्यात आली व सर्व यानांवर सारखीच करण्यात आली. या यानाच्या शेपटाचा आराखडाही नंतर बदलण्यात आला. त्यात वेग प्रतिबंधक छत्रीची (ड्रॅग शुट) यंत्रणा इ.स. १९९२ मध्ये बसवण्यात आली.

तांत्रिक माहिती

[संपादन]

आतल्या बाजूने या यानात वेळ पडल्यावर बाहेर पडू शकतील असे इजेक्शन सीट [मराठी शब्द सुचवा] - बैठका लावण्यात आल्या होत्या. या बैठका चाचणी उड्डाणात होत्या, परंतु नंतर त्या काढून टाकण्यात आल्या होत्या. कोलंबिया हे एकच यान होते ज्या मध्ये यानाच्या कप्तानासाठी डोक्यापेक्षावर असलेले 'डिस्प्ले'(heads-up display)[मराठी शब्द सुचवा] नव्हते. इतर यानांप्रमाणेच नंतरच्या काळात कोलंबियाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. यात नवीन सहजतेने दिसणारे 'डिस्प्ले'[मराठी शब्द सुचवा] आणि हलक्या वजनाच्या बैठका अंतर्भूत करण्यात आल्या. याचे हवाबंद करता येणारे 'आतले दार'[मराठी शब्द सुचवा] मात्र तसेच ठेवण्यात आले होते. मात्र त्यात बाहेरून लावता येणारे हवाबंद दारही जोडता येईल अशी सुधारणा करण्यात आली होती. या सुधारणा व डॉकिंग अडॅप्टर (docking adapter) [मराठी शब्द सुचवा] आणि हवाबंद करता येणारे 'आतले दार' असल्यामुळे या यानचा हबल दुर्बिणिच्या दुरुस्ती मोहिमांमध्ये नासा खूप उपयोग झाला होता.

शेवटचे उड्डाण व स्फोट

[संपादन]

सोळा दिवस चाललेल्या नासाच्या अंतराळ मोहिमे नंतर फेब्रुवारी १, इ.स. २००३ रोजी हे यान वातावरणात परतत होते. या उड्डाणात डाव्या पंखावरील तापमान प्रतिबंधक आवरणाला एक भोक पडले. यानाच्या घर्षणाने अतितप्त झालेली हवा यानाच्या पंखातले मुख्य आधार नष्ट करत गेली यामुळे यानाचा तोल ढळला. आत गेलेल्या तप्त हवेमुळे यानाचे तापमान प्रचंड वाढले आणि यानाचा स्फोट होवून सर्व अंतराळवीर मृत्यु पावले होते.

कोलंबिया अंतराळयान सकाळी - वेळ ८:५७ फेब्रुवारी १, इ.स. २००३ न्यु मेक्सिको या अमेरिकेतील राज्याच्या वर असतांनाचे चित्र. या चित्रात डाव्या पंखावरील आवरण सुटतांना दिसत आहे.

चौकशी मध्ये असे आढळले की उड्डाणाच्या (१६ दिवसांपूर्वी) वेळी लाँचपॅडच्या [मराठी शब्द सुचवा] आधाराचा एक तुकडा कोलंबियाच्या पंखावर पडला होता व त्याने पंखाला एक छिद्र पाडले होते.

अधिक माहिती

[संपादन]

या यानातील मृत्युमुखी पडलेल्या अंतराळवीरांची आठवण म्हणून कॉलोराडो येथील एका पर्वत शिखराचे नामकरण कोलंबिया पॉइंट असे करण्यात आले. तसेच मंगळावरील एका टेकडीचे नामकरण कोलंबिया टेकडी असे करण्यात आले आहे.

कोलंबिया अंतराळयान पहिल्या उड्डाणाच्या वेळी तयार

बाह्य दुवे

[संपादन]

तिरपी मुद्राक्षरे