डिसेंबर १९
Appearance
(१९ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५३ वा किंवा लीप वर्षात ३५४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३२४ - रोमन सम्राट लिसिनीयसने पदत्याग केला
बारावे शतक
[संपादन]- ११८७ - क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड
अठरावे शतक
[संपादन]- १७७७ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या कॉंटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला
विसावे शतक
[संपादन]- १९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली
- १९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
- १९१६ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
- १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन
- १९६३ - झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मद राजेपदी
- १९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले
- १९९७ - सिल्क एरची फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बॅंग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण
- २००२ - व्ही.एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
- २०१० - राहुल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
जन्म
[संपादन]- १५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार.
- १६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा.
- १८९४ - कस्तुरभाई लालभाई, भारतीय दानशूर व उद्योगपती.
- १८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते.
- १९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’’ओमप्रकाश’’, हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते.
- १९२७ - वसंत वऱ्हाडपांडे, मराठी समीक्षक व भाषाअभ्यासक
- १९४० - गोविंद निहलानी, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी
- १९३४ - प्रतिभा पाटील, भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती.
- १९७४ - रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ४०१ - पोप अनास्तासियस पहिला
- १३७० - पोप अर्बन पाचवा
- १७३७ - जेम्स सोबेस्की, पोलंडचा युवराज
- १७४१ - व्हिटस बेरिंग, नेदरलॅंड्सचा शोधक
- १९२७ - अशफाक उल्ला खान - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १९००)
- १९२७ - राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९७)
- १९२७ - रोशन सिंग - भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९२)
- १९३९ - हान्स लॅंगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी
- १९५३ - रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन, नोबेल पारितोषिक विजेता
- १९९७ - सुरेन्द्र बारलिंगे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष.
- १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक
- १९९९ - हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी, रणजी व कसोटी क्रिकेट खेळाडू, क्रीडा संघटक.
- २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - झांझिबार
- गोवा मुक्ती दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - (डिसेंबर महिना)