व्हर्दुनची लढाई
Appearance
व्हर्दुनची लढाई पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांस आणि जर्मनी मध्ये लढली गेलेली लढाई होती. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर, इ.स. १९१६ दरम्यान झालेली ही लढाई या महायुद्धातील सगळ्यात मोठ्या लढायांपैकी एक होती. सुमारे २४ लाख सैनिकांनी भाग घेतलेल्या या लढाईत ३ लाखांहून अधिक सैनिक मृत्युमुखी पडले तर इतर ६ लाखांपेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. नऊ महिने आणि २७ दिवसांनतर जर्मनीने माघार घेतल्यावर फ्रांसचा यात विजय झाला.