गोविंद निहलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोविंद निहलानी

गोविंद निहलानी (११ डिसेंबर, इ.स. १९४० - हयात ) हे भारतीय पटकथालेख, चलचित्रकार, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केली. दूरचित्रवाणी माध्यमांतही त्यांनी कार्य केले आहे, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक पहलाज निहलानी हे गोविंद यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.