Jump to content

राम प्रसाद बिस्मिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम प्रसाद बिस्मिल

राम प्रसाद बिस्मिल
टोपणनाव: राम, अज्ञात, बिस्मिल
जन्म: जुन ११, इ.स. १८९७
शाहजहांपूर, उत्तर-पश्चिमी प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू: डिसेंबर १९, इ.स. १९२७
गोरखपूर, ब्रिटिश भारत आग्रा आणि अवधचा युनायटेड प्रांत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन


राम प्रसाद बिस्मिल (११ जून, इ.स. १८९७ - डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५ च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटिश सरकारने १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी दिली.

लेखन

[संपादन]

बिस्मिल स्वातंत्र्य सेनानी तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी हिंदीउर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केले. त्यात "बिस्मिल" हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.

रामप्रसाद बिस्मिल यांच्यावरील पुस्तके

[संपादन]
  • कथा क्रांतिवीरांच्या भाग १ ते ५ (रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला खाँ, सुखदेव, भगतसिंह, चंद्रशेखर आज़ाद यांच्या कहाण्या, पाच पुस्तकांतून; लेखिका - नयनतारा देसाई))
  • Krantiveer Ramprasad Bismil (इंग्रजी, लेखिका - नयनतारा देसाई)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]