विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विषय प्रवेश[संपादन]

विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युध्दसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशातून उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो.

ओळख[संपादन]

विमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धड, पंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युद्धसाहित्य, तसेच वैमानिक कक्ष, इंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.

बोइंग ७७७ प्रवासी विमान

उडण्याचे तत्त्व[संपादन]

विमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना वेग घेतला की पंखांखालील हवेचा दाब पंखांवरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो आणि विमान हवेत उडू लागते.

इतिहास[संपादन]

पौराणिक काळापासून विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.

आधुनिक इतिहासात ऑरविल आणि विलबर राईट बंधूंनी यशस्वी रित्या विमान आकाशात उडवले. त्यांच्या आधी व नंतरही विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग झाले. त्यातूनच आजच्या रूपातील विमानाची निर्मिती झाली.

विमानांचे वर्गीकरण[संपादन]

विमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.

सेस्ना जातीचे पाण्यावर उतरणारे विमान

उपयोगानुसार:

संरचनेनुसार:

  • पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
  • शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)
  • (गायरो?)

वेगानुसार:

  • स्वनातीत (सुपर सॉनिक)

शक्तीस्रोतानुसार:

  • दट्टायंत्र (प्रॉपेलर)
  • उष्णवायुझोतयंत्र (जेट)

उड्डाणतत्त्वानुसार:

  • हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
  • हवेपेक्षा हलके (वायुफुगा)

बाह्य दुवे[संपादन]

विमानाच्या ब्‍लॅकबॉक्स बद्दल माहिती[मृत दुवा]