चिनी भाषा
Appearance
चिनी | |
---|---|
汉语, 漢語, Hànyǔ | |
चिनी - जुन्या लिपीमध्ये (वर), नव्या चिनी लिपीमध्ये (मध्ये) | |
प्रदेश | आग्नेय आशिया |
लोकसंख्या | १२० कोटी |
भाषाकुळ |
चिनी-तिबेटी
|
लिपी | चिनी लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
चीन तैवान सिंगापूर हाँग काँग मकाओ |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | yue |
चिनी (जुनी चिनी लिपी: 汉语; नवी चिनी लिपी: 漢語; फीनयीन: Hànyǔ) हा चिनी-तिबेटी भाषासमूहामधील एक प्रमुख उपसमूह आहे. चिनी भाषा प्रामुख्याने हान चिनी वंशाचे लोक वापरतात. चीन तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये चिनी भाषा वापरल्या जातात. आजच्या घडीला जगातील १३० कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या १६ टक्के) लोकांची पहिली भाषा चिनी भाषासमूहामधील एक आहे.
वर्गीकरण
[संपादन]चिनी भाषासमूहामधील विविध भाषांचे वर्गीकरण खालील ७ गटांमध्ये प्रकारे केले जाते.
- मॅंडेरिन - ८० कोटी भाषिक
- मिन चिनी - ७.५ कोटी भाषिक
- वू चिनी - ७.४ कोटी भाषिक
- यू चिनी (कॅंटोनीज भाषा) - ६.८ कोटी भाषिक
- गान चिनी
- ष्यांग चिनी
- हाक्का चिनी
लिपी
[संपादन]चिनी लिपीमध्ये इतर भाषांप्रमाणे मुळाक्षरे नसून त्याऐवजी चित्रलिपीचा वापर केला जातो.
संदर्भ
[संपादन]