हान्स लांग्सडोर्फ
Appearance
(हान्स लॅंगडोर्फ या पानावरून पुनर्निर्देशित)
हान्स विल्हेम लांग्सडोर्फ (२० मार्च, इ.स. १८९४:बर्गन, रुगेन, जर्मनी - २० डिसेंबर, इ.स. १९३९:बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना) हा एक जर्मन आरमारी अधिकारी होता. लांग्सडोर्फ पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीचा कप्तान होता. रिव्हर प्लेटच्या लढाईत हार पत्करल्यावर लांग्सडोर्फने आत्महत्या केली. त्याची इच्छा आपल्या युद्धनौकेबरोबरच मरण पत्करण्याची होती, परंतु त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी त्याला पटविले की दोस्त राष्ट्रांच्या हाती पडलेल्या आपल्या खलाशांची व अधिकाऱ्यांची जबाबदारी त्याच्यावरच होती. लांग्सडोर्फने दोस्त अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून स्वतःच्या अधिकाऱ्यांची व खलाशांची व्यवस्था लावून दिली व नंतर ग्राफ स्पीच्या ध्वजावर झोपून स्वतःस गोळी मारून घेतली.