फेब्रुवारी ६
Appearance
(६ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३७ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौथे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७८८ - मॅसेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१९ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.
- १८४० - वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
विसावे शतक
[संपादन]- १९१८ - ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
- १९२२ - अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला.
- १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
- १९३६ - जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९५१ - न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
- १९५२ - इंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
- १९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
- १९६८ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९९६ - टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्यावर बंदी.
- २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
- २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.
- २००४ - चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.
- २०२३ - तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात २८,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- १६११ - चोंग्झेन, चीनी सम्राट.
- १६६४ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६६५ - ॲन, इंग्लंडची राणी.
- १६९५ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १८७६ - सेलर यंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - गॉर्डन व्हाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - एलियास हेन्ड्रेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९११ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१२ - ॲव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
- १९१५ - प्रदीप, हिंदी कवी.
- १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.
- १९७० - डॅरेन लेहमान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - टोनी सुजी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - ब्रॅन्डन टेलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९९३ - आर्थर ॲश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १५९३ - ओगिमाची, जपानी सम्राट.
- १६८५ - चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७४० - पोप क्लेमेंट बारावा.
- १८९९ - लिओ फोन कॅप्रिव्ही, जर्मनीचा चॅन्सेलर.
- १९१८ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.
- १९३१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.
- १९५२ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
- १९६४ - एमिलियो अग्विनाल्दो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.
- १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यू पत्करणारा शेवटचा माणूस.
- १९९३ - आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- २००१ - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, कांग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री.
- २०२२ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- वैतंगी दिन - न्यू झीलंड.
- बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया.
- जम्मू-काश्मीर दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना)