अटलांटिक महासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः १०६.४दशलक्ष वर्ग-कि.मी. आहे. ह्या महासागराने पृथ्वीवरील जवळ जवळ एक पंचमांश पृष्ठ व्यापले आहे. 'अटलांटिक' हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. ऍटलासचा सागर तो अटलांटिक. या नावाचा उल्लेख सर्वप्रथम हेरोडोटस संस्कृतीच्या इतिहासात साधारण इ.पू.४५० च्या सुमारास आढळतो.

अटलांटिक महासागर (यात आर्क्टिक आणि अंटार्क्टिक विभाग समाविष्ट नाहीत
मॅसेच्युसेट्सच्या नांटुकेट येथील अटलांटिक समुद्रकिनारा

अटलांटिक महासागर इंग्रजी एस (S) आकारात असून, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैरृत्येला पॅसिफिक महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर, आणि दक्षिणेला दक्षिणी महासागर/ दक्षिणी समुद्र यांना मिळतो. विषुववृत्त या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन भागांमध्ये विभागते.

प्रमुख उपसमुद्र[संपादन]

भोवतालचे देश[संपादन]

युरोप[संपादन]

आफ्रिका[संपादन]

दक्षिण अमेरिका[संपादन]

कॅरिबियन[संपादन]

मध्य व उत्तर अमेरिका[संपादन]