बर्लिनची भिंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९८६ साली टिपलेले बर्लिन भिंतीचे छायाचित्र

बर्लिनची भिंत ही बर्लिन ह्या शहराचे विभाजन करण्यासाठी उभारण्यात आलेली एक काँक्रिटची भिंत होती. दुसर्‍या महायुद्धानंतर पराभूत नाझी जर्मनीचे पूर्व जर्मनीपश्चिम जर्मनी ह्या दोन स्वतंत्र राष्टांमध्ये दुभाजन करण्यात आले. ह्या दुभाजनादरम्यान नाझी जर्मनीची राजधानी बर्लिनचे देखील पूर्व बर्लिनपश्चिम बर्लिन असे दोन भाग करण्यात आले. पूर्व जर्मनीमधील कम्युनिस्ट राजवटीने १९६१ साली पश्चिम बर्लिनला पुर्णपणे वेढून टाकणारी ही भिंत बांधली. पूर्व जर्मनीमधुन होणारे जर्मन नागरिकांचे पलायन थांबवणे हा ह्या भिंतीचा मुख्य उद्देश होता.

पश्चिम बर्लिनला पुर्णपणे वेढणारी बर्लिनची भिंत

बर्लिनची भिंत बांधण्यापुर्वी १९४५ ते १९६१ दरम्यान अंदाजे ३५ लाख पूर्व जर्मन नागरिकांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले होते होते. ही भिंत बांधल्यानंतर हे पलायन जवळजवळ संपुर्णपणे संपुष्टात आणण्यात आले.

९ ऑक्टोबर १९८९ रोजी पूर्व व पश्चिम जर्मनीमधील करारानुसार नागरिकांना सीमा ओलांडुन जाण्याची परवानगी देण्यात आली. ह्या दिवसानंतर बर्लिनची भिंत टप्याटप्याने पाडुन टाकण्यात आली. ही घटना १९९० मध्ये झालेल्या दोन जर्मन राष्टांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.