वूडब्रिज टाउनशिप (न्यू जर्सी)
Appearance
(वूडब्रिज टाउनशिप या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील वूडब्रिज टाउनशिप शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वूडब्रिज टाउनशिप (निःसंदिग्धीकरण.
वूडब्रिज टाउनशिप अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,५८५ होती.
इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याने १ जून, १६६९ रोजी या शहराची स्थापना करण्याचे फर्मान काढले. याला इंग्लंडमधून मॅसेच्युसेट्समध्ये स्थलांतर झालेल्या रेव्हरंड जॉन डब्ल्यू. वूडब्रिजचे नाव देण्यात आले आहे. वूडब्रिज या ठिकाणी १६६४पासून राहत होता.
न्यू जर्सी टर्नपाइक आणि गार्डन स्टेट पार्कवे हे न्यू जर्सीमधील दोन प्रमुख पथभारित (टोल असलेले) हमरस्ते या शहरातून जातात. अमेरिकेतील पहिला क्लोव्हर लीफ[मराठी शब्द सुचवा] चौफुला या गावात १९२९साली रूट २५ आणि रूट ४ च्या तिठ्यावर बांधण्यात आला होता.