जुलै २४
Appearance
(२४ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०५ वा किंवा लीप वर्षात २०६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४८७ - नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
सोळावे शतक
[संपादन]- १५६७ - मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
अठरावे शतक
[संपादन]- १७०१ - ऑंत्वान दिला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३२ - बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
- १८४७ - आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
- १८६६ - टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
विसावे शतक
[संपादन]- १९०१ - प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बँकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
- १९११ - हायराम बिंगहॅम तिसऱ्याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
- १९१५ - ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
- १९२३ - लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
- १९३१ - पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
- १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
- १९६९ - सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- २००२ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००५ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
- २०१४ - एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.
जन्म
[संपादन]- १७८६ - जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
- १८५१ - फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ.
- १८६७ - फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
- १९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
- १९४७ - झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९६४ - बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९६९ - जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.
मृत्यू
[संपादन]- ११२९ - शिराकावा, जपानी सम्राट.
- १८६२ - मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- १९८० - पीटर सेलर्स, ब्रिटिश अभिनेता.
- १९९६ - मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- सिमोन बॉलिव्हार दिन - इक्वेडोर, व्हेनेझुएला.
- बाल दिन - व्हानुआतु.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै महिना