विल्यम सिडनी पोर्टर
विल्यम सिडनी पोर्टर (११ सप्टेंबर, इ.स. १८६२:उत्तर कॅरोलिना, अमेरिका - ५ जून, इ.स. १९१०:उत्तर कॅरोलिना, अमेरिका) हा एकोणीसाव्या शतकातील लेखक त्याच्या ओ. हेन्री ह्या टोपण नावाने जास्त ओळखला गेला आहे. त्याच्या लेखनशैलीत प्रामुख्याने लघुकथांचा समावेश आहे. ओ. हेन्रीच्या लघुकथा ह्या त्यांच्या बुद्धीचातुर्य तसेच अनपेक्षित शेवटासाठी ओळखल्या जातात.
पोर्टरचा जन्म १८६२ साली उत्तर कॅरोलिना येथे झाला. पोर्टरचे वडील एक डॉक्टर होते. १८८२ साली पोर्टर टेक्सासला स्थलांतरीत झाला. येथेच त्याला स्व:तामधील लेखन कलेची जाणीव झाली.
पोर्टरच्या कथा एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला लीहिल्या गेल्या आहेत. द गिफ्ट ऑफ मॅगी, द लास्ट लीफ, कॉप ॲन्ड द अन्थेम ह्या पोर्टरच्या काही अप्रतीम कथा आहेत. पोर्टर काही काळ होन्डुरासच्या त्रुहियो शहरात राहिला होता. त्याच्या ऑफ कॅबेजेस अँड किंग्स या लघुकथासंग्रहातील अनेक कथा या शहरात घडतात.
पोर्टरचे निधन ५ जुन १९१० साली उत्तर कॅरोलिना येथे वयाच्या ४७ व्या वर्षी झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |