अझीम प्रेमजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अझीम प्रेमजी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. गेल्या चार दशकात त्यांनी विप्रो कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आणली. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला.

२००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अझीम प्रेमाजीनी स्थापन केलेल्या कंपन्यांची सूची[संपादन]

  • विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
  • विप्रो नेट, १९९९
  • नेटक्रेकर, २०००
  • विप्रो वॉटर, २००८
  • विप्रो इकोएनर्जी, २००९