Jump to content

मार्टिन वान ब्यूरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्टिन व्हॅन ब्युरेन या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्टिन वान ब्यूरन

सही मार्टिन वान ब्यूरनयांची सही

मार्टिन वान ब्यूरन (मराठी लेखनभेद: मार्टिन व्हॅन ब्यूरेन; डच, इंग्लिश: Martin Van Buren ;) (५ डिसेंबर, इ.स. १७८२ - २४ जुलै, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा आठवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८३७ ते ४ मार्च, इ.स. १८४१ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. त्याआधी इ.स. १८३३ ते इ.स. १८३७ या कालखंडात तो अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षही होता. अँड्र्यू जॅक्सन याच्या कारकिर्दीत त्याने परराष्ट्रसचिव पदाची जबाबदारी सांभाळली.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिनीच्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या वान ब्यूरनाचे घराणे डच होते. इंग्लिश ही प्रथमभाषा म्हणून न बोलणारा व 'अमेरिकन नागरिक' म्हणून जन्माला आलेला तो पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचे सर्व राष्ट्राध्यक्ष अमेरिकन क्रांतीपूर्वी ब्रिटिश नागरिक म्हणून जन्मले होते.

वान ब्यूरनाची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८३७ सालातील आर्थिक मंदीमुळे अडचणीची ठरली. आर्थिक मंदीचे खापर फोडत वान ब्यूरनाच्या राजकीय विरोधकांनी त्याची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८४१ सालातील निवडणुकांत संपुष्टात आणली. इ.स. १८४८ साली तो फ्री सॉइल पार्टी या त्रयस्थ पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढला.

बाह्य दुवे

[संपादन]