२०२० उन्हाळी ऑलिंपिक
Jump to navigation
Jump to search
२०२० उन्हाळी ऑलिंपिक XXXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | टोकियो![]()
|
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २४
|
सांगता | ऑगस्ट ९ |
मैदान | नॅशनल स्टेडियम
|
◄◄ २०१६ ![]() |
२०२० उन्हाळी ऑलिंपिक (जपानी: 2020年夏季オリンピック) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३२वी आवृत्ती पूर्व आशिया खंडातील जपान देशामधील टोकियो ह्या शहरामध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० मध्ये खेळवण्यात येईल. ७ सप्टेंबर २०१३ रोजी आर्जेन्टिनाच्या बुएनोस आइरेस शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या १२५व्या अधिवेशनादरम्यान टोकियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी इस्तंबूल व माद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती.
१९६४ सालानंतर टोकियोमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा दुसऱ्यांदा खेळवल्या जातील. दोनदा हा मान मिळणारे टोकियो हे आशिया खंडामधील पहिलेच शहर असेल.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत