Jump to content

नागानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागानो
長野市
जपानमधील शहर


ध्वज
नागानो is located in जपान
नागानो
नागानो
नागानोचे जपानमधील स्थान

गुणक: 36°38′00″N 138°11′8″E / 36.63333°N 138.18556°E / 36.63333; 138.18556

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत नागानो
प्रदेश चुबू
क्षेत्रफळ ८३४.८५ चौ. किमी (३२२.३४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,८७,१४६
  - घनता ४६० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
city.nagano.nagano.jp


नागानो (जपानी: 長野市) हे जपान देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर वसले असून ते नागानो ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. सातव्या शतकामधील झेन्को-जी नावाच्या बौद्ध मंदिरासाठी नागानो प्रसिद्ध आहे. २०११ साली नागानोची लोकसंख्या सुमारे ३.८७ लाख होती.

नागानो हे १९९८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर होते. जपानच्या शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग नागानोला राजधानी तोक्यो सोबत जोडतो.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: