Jump to content

इस्तंबूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्तंबूल
metropolitan municipality in Turkey, former capital, महानगर, largest city, port city, मोठे शहर
स्थापना२९ मे 1453 संपादन
नावEshanebul संपादन
अधिकृत नावİstanbul संपादन
मूळ लेबलİstanbul संपादन
DemonymIstanbulite, Istanbulano, Istanbuler, Stambouliote संपादन
खंडयुरोप, आशिया संपादन
देशतुर्कस्तान संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीइस्तंबूल प्रांत, ओस्मानी साम्राज्य संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानइस्तंबूल प्रांत संपादन
पाणीसाठ्याजवळबोस्फोरस, मार्माराचा समुद्र, काळा समुद्र, Golden Horn संपादन
Located in/on physical featureमार्मारा प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक४१°०′३६″N २८°५७′३७″E संपादन
सर्वोच्च बिंदूAydos Hill संपादन
Office held by the head of governmentmayor of Istanbul संपादन
सरकारचे प्रमुखNuri Aslan संपादन
सदस्यताCreative Cities Network, League of Historical Cities, Organization of World Heritage Cities संपादन
Contains the administrative territorial entityZeytinburnu, Ümraniye, Ataşehir संपादन
Coextensive withइस्तंबूल प्रांत संपादन
मागील.Constantinople संपादन
मागीलConstantinople संपादन
महत्वाची घटनाoccupation of Istanbul संपादन
SRGB color hex triplet0E3B83 संपादन
पुरस्कारThe Europe Prize संपादन
Connects withE80 संपादन
डाक संकेतांक34000–34990 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.istanbul.gov.tr/ संपादन
Described at URLhttps://www.bbc.co.uk/travel/article/20251118-istanbul-turkey-inside-the-city-where-cats-rule-the-streets संपादन
HashtagIstanbul संपादन
Geography of topicgeography of Istanbul संपादन
History of topichistory of Istanbul, timeline of Istanbul history संपादन
Köppen climate classificationoceanic climate, humid subtropical climate, warm-summer Mediterranean climate, hot-summer Mediterranean climate संपादन
State of conservationpreserved संपादन
Related categoryCategory:Istanbul-related lists संपादन
Economy of topiceconomy of Istanbul संपादन
Demographics of topicdemographics of Istanbul संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड212, 216 संपादन
परवाना पाटी संकेत (नंबरप्लेट)34 संपादन
Category for the view of the itemCategory:Views of Istanbul संपादन
Category for maps or planslist of districts of Istanbul संपादन
Map

इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्रकाळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे.

या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते.

सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे.

फुटबॉल हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. गालातसराय एस.के., बेसिक्टास जे.के. आणि फेनर्बाचे एस.के. हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान तुर्की ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत भरवली गेली.

इस्तंबूलवरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • इस्तंबूल इस्तंबूल (अनुवादित कादंबरी; मूळ तुर्की लेखक - बुऱ्हान सोनमेझ; मराठी अनुवादक - सविता दामले)
  • इस्तंबुल टु अथेन्स (प्रवासवर्णन, लेखक -अच्युत बन)
  • इस्तंबूल ते कैरो (लेखकाच्या मते इस्लामची दोन रूपे, आठवणी, लेखक - निळू दामले)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: