मॅसिडोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मॅसिडोनिया
Република Македонија
मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक
मॅसिडोनियाचा ध्वज मॅसिडोनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Денес над Македонија
मॅसिडोनियाचे स्थान
मॅसिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
स्कोप्ये
अधिकृत भाषा मॅसिडोनियन
इतर प्रमुख भाषा आल्बेनियन, तुर्की, रोमानी, सर्बियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख ज्योर्ज इव्हानोव्ह
 - पंतप्रधान निकोला ग्र्युव्स्की
महत्त्वपूर्ण घटना
 - क्रुस्येव्हो प्रजासत्ताक 3–13 ऑगस्ट 1903 
 - युगोस्लाव्हियामधील मॅसिडोनियाचे जनतेचे प्रजासत्ताक 8 मार्च 1946 
 - स्वातंत्र्य
युगोस्लाव्हियापासून
8 सप्टेंबर 1991 
 - मान्यता
संयुक्त राष्ट्रांद्वारे
8 एप्रिल 1993 
क्षेत्रफळ
 - एकूण २५,७१३ किमी (१४८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.९
लोकसंख्या
 -एकूण २०,५८,५३९ (१४६वा क्रमांक)
 - घनता ८०.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २,२१४.७ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,७१८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१३) ०.७३२ (उच्च) (८४ वा)
राष्ट्रीय चलन मॅसिडोनियन देनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MK
आंतरजाल प्रत्यय .mk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८९
राष्ट्र_नकाशा


मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Северна Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रेयुरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटोयुरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.

इतिहास[संपादन]

रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. रोमन सम्राट डायोक्लेशनने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये ग्रीकलॅटिन ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्लाव्ह लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून बायझेंटाईन साम्राज्यबल्गेरियामध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर ओस्मान्यांची सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.

२०व्या शतकाच्या सुरूवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन बाल्कन युद्धांनंतर व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग सर्बियाच्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली.

अर्थतंत्र[संपादन]

मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील वार्षिक दरडोई उत्पन्न युरोपामध्ये खालच्या पातळीवर आहे.

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: