इस्वाटिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इस्वाटिनी / स्वाझीलँड
Kingdom of Swaziland
Umbuso weSwatini
इस्वाटिनीचे राजतंत्र
इस्वाटिनी / स्वाझीलँडचा ध्वज इस्वाटिनी / स्वाझीलँडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Siyinqaba" (स्वाती
(आम्ही अभेद्य आहोत)
राष्ट्रगीत: "Nkulunkulu Mnikati wetibusiso temaSwati"
इस्वाटिनी / स्वाझीलँडचे स्थान
इस्वाटिनी / स्वाझीलँडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी एम्बबने, लोबाम्बा
सर्वात मोठे शहर एम्बबने
अधिकृत भाषा इंग्लिश, स्वाती
सरकार संसदीय प्रजासत्ताकसंपूर्ण राजेशाही
 - राष्ट्रप्रमुख राजा उम्स्वाती तिसरा
 - पंतप्रधान बार्नाबस सिबुसिसो द्लामिनी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ सप्टेंबर १९६८ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १७,३६४ किमी (१५७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.९
लोकसंख्या
 -एकूण ११,८५,००० (१५४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५८.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६.२३३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,३०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५२२ (मध्यम) (१४० वा) (२०११)
राष्ट्रीय चलन स्वाझी लिलांगेनी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०२:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SZ
आंतरजाल प्रत्यय .sz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६८
राष्ट्र_नकाशा


इस्वाटिनी तथा स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. इस्वाटिनीच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. इस्वाटिनीचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. या देशाचे पूर्वीचे नाव स्वाझीलँड होते. इस्वाटिनीमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.

इस्वाटिनी हा एक अत्यंत गरीब देश असून या देशाची लोकसंख्या १ कोटी २० लाख आहे. देशातील तब्बल ६९ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असून त्यांना अवघ्या ८० रुपयांत दिवस ढकलावा लागतो. या देशात बेरोजगारीचा दर ४० टक्के असून तितकेच लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.

इस्वाटिनी एक मागासलेला देश असून येथील कमकुवत अर्थव्यवस्था व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून आहे. स्वाझीलँडमध्ये एड्स रोगाने थैमान घातले असून येथील २६.१ टक्के नागरिकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे जे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एड्स रोगामुळे इस्वाटिनीच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३१.८८ वर्षे हे येथील लोकांचे सरासरी आयुर्मान जगात नीचांकावर आहे. "स्वाझीलँडमधील एड्सचा विळखा असाच राहिला तर ह्या देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल" ह्या शब्दांत संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने येथील परिस्थितीचे वर्णन केले आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

इस्वाटिनीवर राजे तिसरे मस्वाती हे स्वाझी राजघराण्याचे प्रमुख असून इस्वाटिनीचे विद्यमान (२०२१ साली) राजे आहेत. या राजाला किमान १५ राण्या, ३० मुले आहेत.

मस्वातींचे वडील राजे सोभुजा यांना १२५ बायका होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मस्वाती यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवली आहे. अवघ्या ४७ वर्षांच्या मस्वातींनी आतापर्यंत १५ लग्ने केली आहेत. २०१३मध्ये त्यांनी १८ वर्षांच्या मुलीसोबत १५वा विवाह केला आहे. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महाल बांधले आहेत. २००९ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार, मस्वाती हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे ६२ अलिशान गाड्यांचा ताफा असून त्यात पाच लाख डॉलरच्या मेबेक कारचाही समावेश आहे. या गाड्यांचे फोटो काढण्यास बंदी आहे.

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: