Jump to content

कझाकस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कझाकस्तान
Қазақстан Республикасы
Qazaqstan Respublïkası
Республика Казахстан
Respublika Kazakhstan
कझाकस्तान प्रजासत्ताक
कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: मेनिन कझाकस्तानिम
vocal version:
<center
कझाकस्तानचे स्थान
कझाकस्तानचे स्थान
कझाकस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी नुरसुल्तान
सर्वात मोठे शहर अल्माटी
अधिकृत भाषा कझाक
 - राष्ट्रप्रमुख Kassym-Jomart Tokayev
 - पंतप्रधान करीम मासीमोव
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (सोवियेत संघ पासून)
१६ डिसेंबर, इ.स. १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण २७,२७,३०० किमी (८ [१]वा क्रमांक)
 - पाणी (%) १.७
लोकसंख्या
 -एकूण १५,२१७,७११ कझाकस्तानी राष्ट्रीय संकेतस्थळ (६२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १,६१,१५५ अब्ज अमेरिकन डॉलर (५६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,६५८ अमेरिकन डॉलर (६६वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन टेंगे
आंतरराष्ट्रीय कालविभाग पुर्व/पश्चिम (यूटीसी +५/+६)
आय.एस.ओ. ३१६६-१ KZ
आंतरजाल प्रत्यय .kz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


कझाकस्तान (कझाक: Қазақстан; रशियन: Казахстан), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाकः Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान) हा मध्य आशिया आणि पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपाहून मोठे आहे. जगभरातील ६ सार्वभौम तुर्की देशांपैकी तो एक आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना आणि कास्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत. मंगोलियाशी याच्या सीमा थेट भिडल्या नसल्या, तरीही मंगोलियाच्या सर्वांत पश्चिमेकडील टोकापासून याची पूर्व टोकाकडील सीमा केवळ ३८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स. १९९७ साली कझाकस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या अल्माटीपासून देशाची राजधानी हलवून नुरसुल्तान येथे नेण्यात आली.

भूगोल[संपादन]

कझाकस्तानाचा भौगोलिक नकाशा (इंग्लिश मजकूर)

मध्य आशियात वसलेला कझाकस्तान ४०° उ. ते ५६° उ. अक्षांशांदरम्यान आणि ४६° पू. ते ८८° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. २७,२७,३०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा देश असून सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. पश्चिम युरोपाएवढे याचे आकारमान आहे. याचा बहुतांश भूभाग आशियात मोडत असला, तरीही उरल पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील याचा अल्पसा भूप्रदेश पूर्व युरोपात मोडतो[२]. कझाकस्तानाचा पूर्वपश्चिम विस्तार पश्चिमेस कास्पियन समुद्रापासून पूर्वेस आल्ताय पर्वतरांगांपर्यंत पसरला असून दक्षिणेकडील मध्य आशियाई वाळवंटी प्रदेशापासून उत्तरेकडील पश्चिम सैबेरिया प्रदेशापर्यंतचा दक्षिणोत्तर भूभाग याने व्यापला आहे. याच्या रशियासोबत ६,८४६ किलोमीटर, उझबेकिस्तानासोबत २,२०३ किलोमीटर, चिनी जनता-प्रजासत्ताकासोबत १,५३३किलोमीटर, किर्गिझस्तानासोबत १,०५१ किलोमीटर, तर तुर्कमेनिस्तानासोबत ३७९ किलोमीटर लांबीच्या सीमा भिडल्या आहेत. सोव्हिएत संघाच्या काळात याचा काही भूभाग याच्यापासून तोडला गेला व तोडलेला भूभाग शेजारील चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या शिंच्यांग प्रांतास व उझबेकिस्तानाच्या काराकालपाकस्तान प्रदेशास देण्यात आला.

कझाक बुद्ध म्हणून ओळखले जाणार पाषणशिल्प (अल्माटी प्रांत)
बौद्ध विहार (अल्माटी प्रांत, कझाकस्तान)

अर्थतंत्र[संपादन]

कझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे. याखेरीज गहू, कापड व प्राणिज उत्पादने या वस्तूंची कझाकस्तान निर्यात करतो. युरेनियम-उत्पादनाच्या इ.स. २०१० सालातील सांख्यिकीनुसार जगभरातील ३३% उत्पादन कझाकस्तानात झाले असून कझाकस्तान जगात अव्वल क्रमांकाचा युरेनियम-उत्पादक देश आहे [३][४].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेल्या देशांची यादी
  2. ^ "कझाकस्तान - एमएसएन एन्कार्टा ज्ञानकोशातील नोंद" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-06-01. १० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "युरेनियम ॲंड न्यूक्लिअर पॉवर इन कझाकस्तान (कझाकस्तानातील युरेनियम व अणुऊर्जा)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-02-23. २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "नं. १ इन वर्ल्ड (जगात अव्वल क्रमांक)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-07-22. २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]