पेराग्वे
पेराग्वे República del Paraguay पेराग्वेचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Paz y justicia (शांतता व न्याय) | |||||
राष्ट्रगीत: Paraguayos, República o Muerte (पेराग्वेयन व्यक्ती, गणराज्य किंवा मृत्यू) | |||||
पेराग्वेचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
आसुन्सियोन | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश, ग्वारानी | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | फेदेरिको फ्रांको | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १४ मे १८११ (स्पेनपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४,०६,७५२ किमी२ (५९वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २.३ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ६४,५४,५४८ (१०१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १४.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३५.३४६ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५,४१२ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६६५ (उच्च) (१०७ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | गुआरानी | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ४:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | PY | ||||
आंतरजाल प्रत्यय | .py | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५९५ | ||||
पेराग्वेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Paraguay, ग्वारानी भाषा:Tetã Paraguái) हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. पेराग्वेच्या उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून उत्तर-दक्षिण वाहते.
सोळाव्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पेराग्वेला १८११ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील अनेक दशके येथे लष्करी हुकुमशहांनी सत्ता गाजवली. त्यांच्या अविचारी व स्वार्थी धोरणांमुळे येथील प्रगती खुंटली व अनेक अनावश्यक युद्धांत येथील ६० ते ७० टक्के जनता मृत्यूमुखी पडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पेराग्वेवर आल्फ्रेदो स्त्रॉसनर ह्याची प्रदीर्घ काळ सत्ता होती. १९८९ साली त्याची लष्करी हुकुमशाही उलथवून टाकण्यात आल्यानंतर पेराग्वेमध्ये १९९३ सालापासून लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या जात आहेत. सध्या पेराग्वे हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक मानला जातो. परंतु २०१० साली पेराग्वेची अर्थव्यवस्था १४.५ टक्के इतक्या दराने वाढली.
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
पेराग्वे किंवा पाराग्वे हे नाव स्थानिक ग्वारानी भाषेतील तीन शब्दांची संधी आहे. पारा = अनेक प्रकारचे; ग्वा = पासूनचे, ठिकाणचे; ए/एह= पाणी, नदी, सरोवर. यानुसार पेराग्वे म्हणजे पाण्यापासून तयार झालेली अनेक प्रकार(ची भूमी) ही व्युत्पत्ती ग्राह्य धरली जात असली तरी या शब्दाच्या उगमाबद्दल इतरही अनेक प्रवाद आहेत.
१. समुद्रात परिवर्तित होणारी नदी.
२. स्पेनच्या लश्करी तज्ञ फेल्किस दे अझाराच्या मते दोन अर्थ आहेत - पायाग्वा आणि पायाग्वाईचे पाणी किंवा स्थानिक आदिवासी सरदार पाराग्वायइयोच्या मानार्थ दिले गेलेले नाव.
३. फ्रेंच-आर्जेन्टिनी इतिहासकार पॉल ग्रूसाकच्या मते पेराग्वेचा अर्थ आहे समुद्रातून वाहणारी नदी.
४. पेराग्वेच्या माजी राष्ट्राध्यक्ष हुआन नातालिसियो गॉन्झालेझच्या मते पेराग्वे म्हणजे समुद्रात वसणाऱ्या लोकांची नदी.
५. फ्रे ॲंतोनियो रुइझ दि मॉंतोयाच्या मते किरीट धारण केलेली नदी.
भूगोल[संपादन]
मोठी शहरे[संपादन]
समाजव्यवस्था[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
खेळ[संपादन]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |