Jump to content

टांझानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टांझानिया
Jamhuri ya Muungano wa Tanzania
United Republic of Tanzania
टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक
टांझानियाचा ध्वज टांझानियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Uhuru na Umoja (स्वातंत्र्य व एकात्मता)
राष्ट्रगीत: "Mungu ibariki Afrika"
(देव आफ्रिकेचे भले करो)
टांझानियाचे स्थान
टांझानियाचे स्थान
टांझानियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी डोडोमा
सर्वात मोठे शहर दार एस सलाम
अधिकृत भाषा स्वाहिली, इंग्लिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख सोमिया सुझुलू हास्सान
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य युनायटेड किंग्डम पासून 
 - टांगानिका ९ डिसेंबर १९६१(जर्मनीपासून
 - झांझिबार १० डिसेंबर १९६३ 
 - एकत्रीकरण २६ एप्रिल १९६४ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९,४५,२०३ किमी (३१वा क्रमांक)
 - पाणी (%) ६.२
लोकसंख्या
 -एकूण ४,३१,८८,००० (३०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४६.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६३.८९२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,५१५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४६६ (कमी) (१५२ वा) (२०१२)
राष्ट्रीय चलन टांझानियन शिलिंग
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी + ३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ TZ
आंतरजाल प्रत्यय .tz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.

टांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल अत्यंत अभिमान वाटतो. पूर्व आफ्रिकेचा भारताशी प्रागैतिहासिक काळापासून व्यापारीक संबंध आहे. काही शतकांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकी सरदाराना "सिद्दी" असे आणि आफ्रिकी नाविकांना व रक्षकांना "हबशी" असे महाराष्ट्रीय लोक म्हणत असत. आफ्रिकेतून आलेल्या जमातींची बहुसंख्या असलेली काही खेडी भारतात अजूनही आहेत. भारतीय सरकार त्या जमातींची आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये वर्गवारी करते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठी लोक टांझानियात तुरळक प्रमाणात स्थायिक झाले आहेत. सध्या टांझानियातली मराठी भाषिकांची संख्या ५०० च्या आसपास आहे.

शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त देशांच्या गटात सामील होऊन टांझानियाने भारताच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टांझानियाचे पूर्वराष्ट्राध्यक्ष स्व. म्वालीमु ज्युलिअस न्यरेरे आणि भारताच्या पूर्वपंतप्रधान स्व. इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते.

इ.स. १९६०च्या सुमाराला युगांडा देशातल्या इदी अमिन ह्या क्रूर हुकूमशहाने जेव्हा भारतीय मूळवंशी जनतेची त्या देशातून हकालपट्टी केली होती तेव्हा स्व. म्वालीमु जुलिअस न्यरेरे ह्यांनी त्या जनतेला टांझानिआत आसरा दिला होता.

डिसेंबर इ.स. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी (चामाचा मापिंदुझी-CCM) पक्षाचे श्री.जकाया किक्वेते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

कित्येक शतकांपूर्वी ह्या देशावर प्रथम जर्मन लोकांनी अतिक्रमण केले होते.

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

टांझानियाच्या उत्तरेस युगांडा, केन्या हे देश व लेक व्हिक्टोरिया हे सरोवर आहेत. पूर्वेस हिंदी महासागर; दक्षिणेस मोझांबिक, मलावीझांबिया हे देश व मलावी सरोवर हे सरोवर तर पश्चिमेस बुरुंडी, र्‍वांडाकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे देश व लेक टांजानिका हे सरोवर आहेत.

राजकीय विभाग[संपादन]

टांझानिया देश एकूण २६ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला असून ह्यांपैकी ५ विभाग स्वायत्त दर्जा असलेल्या झांझिबार ह्या बेटावर तर उर्वरित मुख्य भूमीवर आहेत.

मोठी शहरे[संपादन]


समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]