१९३६ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९३६ उन्हाळी ऑलिंपिक
XI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बर्लिन
जर्मनी नाझी जर्मनी


सहभागी देश ४९
सहभागी खेळाडू ३,९६३
स्पर्धा १२९, १९ खेळात
समारंभ
उद्घाटन ऑगस्ट १


सांगता ऑगस्ट १६
अधिकृत उद्घाटक चान्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९३२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४० ►►


१९३६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामध्ये ऑगस्ट १ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४९ देशांमधील ३,९६३ खेळाडूंनी भाग घेतला.

नाझी जर्मनीमध्ये हिटलरच्या नेत्र्त्वाखाली सत्तेवर असलेल्या नाझी पक्षाने ह्या स्पर्धेत आर्यनेतर वर्णाच्या खेळाडूंना जर्मनीतर्फे खेळण्यास मज्जाव केला होता. नाझी पक्षाच्या ह्या व इतर अनेक उघड ज्यूविरोधी धोरणांमुळे अनेक देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता. अनेक देशांच्या ज्यू खेळाडूंनी येथे भाग घेण्यास नकार दिला होता. खेळाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह ब्रॉडकास्ट) करणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

अफगाणिस्तान, बर्म्युडा, बोलिव्हिया, कोस्टा रिका, लिश्टनस्टाइनपेरू ह्या सहा देशांची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. स्पेनसोव्हिएत संघ ह्या देशांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 जर्मनी जर्मनी (यजमान) 33 26 30 89
2 अमेरिका अमेरिका 24 20 12 56
3 हंगेरी हंगेरी 10 1 5 16
4 इटली इटली 8 9 5 22
5 फिनलंड फिनलंड 7 6 6 19
फ्रान्स फ्रान्स 7 6 6 19
7 स्वीडन स्वीडन 6 5 9 20
8 जपान जपान 6 4 8 18
9 नेदरलँड्स नेदरलँड्स 6 4 7 17
10 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 4 7 3 14

बाह्य दुवे[संपादन]