"पोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →कर्नाटकी बेंदूर: संदर्भ घातला |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
== कर्नाटकी बेंदूर == |
== कर्नाटकी बेंदूर == |
||
[[महाराष्ट्र]]- [[कर्नाटक]] सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-4GcAAAAMAAJ&q=bendur+festival&dq=bendur+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjw5-e-6-PjAhVeknAKHZptCwkQ6AEIMDAB|title=The bountiful banyan: a biography of karmaveer Bhaurao Patil|last=Patil|first=Pandurang Ganapati|last2=Mumbaī|first2=Yaśvantarāva Cavhāṇa Pratishṭhāna|date=2002|publisher=Macmillan India|isbn=9780333936887|language=en}}</ref> हा सण [[वटपौर्णिमा|वटपौर्णिमेच्या]] दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=sSAiAQAAIAAJ&q=bendur+festival&dq=bendur+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjw5-e-6-PjAhVeknAKHZptCwkQ6AEINjAC|title=The Cultural Dimension of Education|last=Saraswati|first=Baidyanath|date=1998|publisher=Indira Gandhi National Centre for the Arts|isbn=9788124601013|language=en}}</ref>पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/bendur-festival-celebrated-with-enthusiasm-in-kolhapur-1110119/|शीर्षक=कोल्हापुरात बेंदूर सण उत्साहात|दिनांक=2015-06-05|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN| |
[[महाराष्ट्र]]- [[कर्नाटक]] सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-4GcAAAAMAAJ&q=bendur+festival&dq=bendur+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjw5-e-6-PjAhVeknAKHZptCwkQ6AEIMDAB|title=The bountiful banyan: a biography of karmaveer Bhaurao Patil|last=Patil|first=Pandurang Ganapati|last2=Mumbaī|first2=Yaśvantarāva Cavhāṇa Pratishṭhāna|date=2002|publisher=Macmillan India|isbn=9780333936887|language=en}}</ref> हा सण [[वटपौर्णिमा|वटपौर्णिमेच्या]] दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=sSAiAQAAIAAJ&q=bendur+festival&dq=bendur+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjw5-e-6-PjAhVeknAKHZptCwkQ6AEINjAC|title=The Cultural Dimension of Education|last=Saraswati|first=Baidyanath|date=1998|publisher=Indira Gandhi National Centre for the Arts|isbn=9788124601013|language=en}}</ref>पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/bendur-festival-celebrated-with-enthusiasm-in-kolhapur-1110119/|शीर्षक=कोल्हापुरात बेंदूर सण उत्साहात|दिनांक=2015-06-05|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-07-30}}</ref> |
||
==पोळा सणावरच्या काही मराठी कविता== |
|||
* आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ([[बहिणाबाई चौधरी]]) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१५:१६, १७ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या किंवा श्रावण अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.[१] बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.[२][३] नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’[४]
स्वरूप
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो असतो.[५]पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.[५] बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.[६]
या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.[७] गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. [८] त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.[९] कुणबी समाजात हा सण विशेष महत्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.[१०]
कर्नाटकी बेंदूर
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.[११] हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. [१२]पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.[१३]
पोळा सणावरच्या काही मराठी कविता
- आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार (बहिणाबाई चौधरी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवा
संदर्भ
- ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ. pp. ६९०.
- ^ Cavhāṇa, Rāmanātha Nāmadeva (1989). Jātī āṇi jamātī. Mehatā Pabliśiṅga Hāūsa.
- ^ Jagalpure, L. B.; Kale, K. D. (1938). Sarola Kasar: study of a Deccan village in the famine zone (इंग्रजी भाषेत). L.B. Jagalpure, Gongale Lane.
- ^ Thasale, Dakshata. India.com (इंग्रजी भाषेत) http://www.india.com/marathi/others/importance-and-significant-of-bail-pola-festival-in-marathi/. 2018-09-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Tribhuwan, Robin D. (2003). Fairs and Festivals of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171416400.
- ^ khaasre.com (इंग्रजी भाषेत) https://khaasre.com/pola-ustav/. 2018-09-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 9788183241137.
- ^ Maharashtra Times (हिंदी भाषेत) https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/bull-festival-bailpola/articleshow/40797709.cms. 2018-09-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ वेबदुनिया. (इंग्रजी भाषेत) http://marathi.webdunia.com/marathi-festivals/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-110090800017_1.htm. 2018-09-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Russell, Robert Vane. The Tribes and Castes of the Central Provinces of India, Volume IV of IV (इंग्रजी भाषेत). Library of Alexandria. ISBN 9781465583024.
- ^ Patil, Pandurang Ganapati; Mumbaī, Yaśvantarāva Cavhāṇa Pratishṭhāna (2002). The bountiful banyan: a biography of karmaveer Bhaurao Patil (इंग्रजी भाषेत). Macmillan India. ISBN 9780333936887.
- ^ Saraswati, Baidyanath (1998). The Cultural Dimension of Education (इंग्रजी भाषेत). Indira Gandhi National Centre for the Arts. ISBN 9788124601013.
- ^ Loksatta https://www.loksatta.com/maharashtra-news/bendur-festival-celebrated-with-enthusiasm-in-kolhapur-1110119/. 2019-07-30 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)