वेसण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेसण म्हणजे पाळीव प्राण्यांच्या दोन नाकपुड्यांमध्ये असलेला कातडी पडदा छेदुन त्यात ओवण्यात येणारी दोरी अथवा एखादी लोखंडी किंवा धातूची बांगडी (रिंग) होय. यास एक दुसरी दोरी जोड्ण्यात येते.ती ओढली असता या वेसणीस ताण बसतो.ताण बसल्यावर त्या प्राण्यास त्रास होतो व तो थांबतो/हळु होतो अथवा नियंत्रणात येतो.त्याने पाळीव प्राण्याच्या चालण्याची /धावण्याची गती कमी करण्यास मदत होते अथवा मानवास त्यास नियंत्रित करणे सोपे होते.हिंदी भाषेत यास 'नकेल' असा शब्द आहे.

सहसा, प्रजोत्पादनास वापरण्यात येणाऱ्या सशक्त वळू अथवा रेड्यास नियंत्रणासाठी अशी धातूची रिंग घालण्यात येते.या रिंगला दोरी बांधून ती दोरी किंचित ताणून एका उंच खाबांस अशा रितीने बांधण्यात येते ज्याने त्या प्राण्याचे डोके व मान वर राहिल.त्यामुळे असा प्राणी गडबड वा मस्ती करीत नाही.त्याचे उपद्रवमुल्य कमी होते.त्याची दृश्यमानता कमी होते व तो माजावर जरी आला तरी, स्वतःचे आवडीने मैथून करू शकत नाही. त्यास हवे तेंव्हास मोकळे करून त्यास वापरून प्रजोत्पादन करता येऊ शकते.

वेसण ही घोडा, बैल, रेडा इत्यादी पाळीव प्राण्यांना घालतात.एखाद्यास ' वेसण घालणे' हा वाक्प्रचार यावरूनच निर्माण झाला.याचा अर्थ नियंत्रणात ठेवणे असा होतो.[ चित्र हवे ]