हळद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
रोजच्या वापरातली हळद-ही हळकुंड कुटुन तयार करतात.
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.

हळद या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात.[१] हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंगचव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे[१]. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावले कि रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाचा वेळी वर, वधूला हळद लावतात.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ "हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक" (मराठी मजकूर). अ‍ॅग्रीप्लाझा. २०जूलै२०१२.  Unknown parameter |ॲयक्सेसदिनांक= ignored (सहाय्य) चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे


बाह्य दुवे[संपादन]

  • अशोक मेहता (१२/८/२०१२). "सांगलीची हळद बाजारपेठ" (मराठी मजकूर). थिंकमहाराष्ट्र. १८/२/२०१३ रोजी पाहिले. शिरीष कुलकर्णी (26/02/2017) वैयक्तिक ज्ञानातून