कवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेगवेगळ्या प्रकारच्या व रंगांच्या कवड्या
कवड्यांचा खेळात वापर

कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे.तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो.

संस्कृती[संपादन]

कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात. तशी प्रथा पूर्वापार चालत आली आहे.त्याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करत हाेते. असे अनेक पुरावे सापडतात. म्हणूनच तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात.अारािधनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार असतात. कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात.कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.