पुरणपोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरणपोळी

पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड खाद्यपदार्थ आहे. देवास पुरणपोळी चा नैवेद्य हा सणादिवशी दाखवला जातो. इतर् भाषांमध्ये (मराठी, कोंकणी: पुरणपोळी/पुरणाची पोळी ,गुजराती: પોળી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु या बोब्बाटु या बोब्बाटलु या पोलेय्लु, भाकशालू).

मराठी मध्ये काहीठीकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती . पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशाप्रकारे पोळीचा अर्थ असा होती कि ज्याचा विस्तार केला जावू शकतो . लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो .पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे . महाराष्ट् ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये वेगवेगळी पद्धत आहे .

पुरणपोळी माहिती[संपादन]

महाराष्ट्रात गुडीपाडवा,मकर संक्रांत ,होळी, बैल-पोळा इत्यादि सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. पुरणपोळी ही तुप आणि दुधाबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार चांगले महत्त्व आहे. महाराष्ट्रात पुरण पोळी लहान-मोठे मोठ्या आवडीने खातात. पुरण पोळी सारखा गोड पदार्थ कसा बनवतात ते पाहू खालीलप्रमाणे :

पुरणपोळीसाठी लागणारे घटक :
  1. ३०० ग्राम् चणे डाळ
  2. ३०० ग्राम् गुळ किंवा साखर
  3. एक छोटा चमचा वेलची पावडर आणि सुंठ
  4. १५० ग्राम् गहू पीठ किंवा मैदा
  5. पाणी

अपवाद : गुजरात मधे तुर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळ नाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

कृती[संपादन]

  1. प्रथम चण्याची डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते .ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
  2. डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आदान (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे . काढून घेतलेले आदान कटाच्या आमटीसाठी वापरतात.
  3. शिजलेली डाळ बारीक् वाटून घेतात. नंतर त्यात गुळ घालून मंद आचेवर गॅस् वर शिजवून घेतात व पुरण तयार होते .
  4. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याचे कणिक तयार करावे . पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुराणामध्ये हळद वापरतात .
  5. नंतर पुरणाचे सारण कणिकेचा गोळा करून त्याच्यात भरतात आणि छान पुरणपोळी लाटून घेतात. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजुन घेतात.

इतर माहिती[संपादन]

पुरण पोळी गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खालली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ , वेलची , सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात. गॅस वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी . थंडझाल्यानंतर त्याच्यात दुध आणि तूप टाकावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल .
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुदधा खातात. जेवताना ताटातगरमागरम पुरण पोळी गुळवणीआणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. कटाची आमटी कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.