मार्च ४
Appearance
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६३ वा किंवा लीप वर्षात ६४ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौदावे शतक
[संपादन]- १३५१ - रामातिबोदी पहिला सयामच्या राजेपदी.
- १३८६ - व्लादिस्लॉ दुसरा जोगैला पोलंडच्या राजेपदी.
पंधरावे शतक
[संपादन]- १४६१ - वॉर ऑफ द रोझेस - एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले.
सोळावे शतक
[संपादन]- १५१९ - कॉॅंकिस्तादोर हर्नान कोर्तेझ मेक्सिकोत येउन पोचला.
सतरावे शतक
[संपादन]- १६६५ - दुसऱ्या ॲंग्लो-डच युद्धाला सुरुवात.
अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - न्यू यॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले.
- १७९१ - व्हर्मॉॅंट अमेरिकेचे बारावे राज्य झाले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३७ - शिकागो शहराची स्थापना.
- १८६१ - अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९४ - चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात.
विसावे शतक
[संपादन]- १९०२ - शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-एची स्थापना.
- १९२१ - नानकाना येथील गुरुद्वारामध्ये ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारात ७० ठार.
- १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटिश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
- १९३६ - हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९५१ - प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन.नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
- १९६० - हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट. १०० ठार.
- १९६६ - केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले. ६४ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - पोर्तुगालच्या कास्तेलो दि पैव्हा शहरातील पूल कोसळला. ७० ठार.
- २००१ - गुरदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण.
जन्म
[संपादन]- १६७८ - ॲंतोनियो विवाल्डी, इटालियन संगीतकार.
- १८४७ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ.
- १८७५ - मिहालि कॅरोल्यी, हंगेरीचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.
- १९०६ - चार्ल्स रुडॉल्फ वॉलग्रीन, जुनियर, अमेरिकन उद्योगपती.
- १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
- १९३५ - प्रभा राव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्या.
- १९३७ - ग्रॅहाम डाउलिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - रोहन बोपन्ना, भारतीय टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- २५१ - पोप लुशियस पहिला.
- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
- ११७२ - स्टीवन तिसरा, हंगेरीचा राजा.
- ११९३ - सलादिन, तुर्कस्तानचा सुलतान.
- १४९६ - सिगिस्मंड, ऑस्ट्रियाचा राजा.
- १९२५ - ज्योतीन्द्रनाथ टागोर, बंगाली साहित्यिक आणि चित्रकार.
- १९३९ - लाला हरदयाल, गदर पार्टीचे स्थापक.
- १९४८ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
- १९७७ - लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८१ - टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.
- १९९२ - शांताबाई परुळेकर, दैनिक सकाळच्या प्रकाशिका.
- १९९६ - आत्माराम सावंत, मराठी नाटककार आणि पत्रकार.
- १९९७ - रॉबर्ट एच. डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - विठ्ठल गोविंद गाडगीळ, एर इंडियाचे पहिले कर्मचारी.
- १९९९ - कारेल व्हान हेट रीव्ह, डच लेखक.
- २००० - गीता मुखर्जी, स्वातंत्र्यसैनिक, साम्यवादी खासदार.
- २००४ - जॉर्ज पेक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००७ - सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
- २०११ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
- २०१६ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]राष्ट्रीय सुरक्षा दिवस - भारत
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - (मार्च महिना)