Jump to content

अर्जुन सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Arjun Singh; অর্জুন সিং; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; अर्जुन सिंग; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; ارجن سنگھ; Arjun Singh; Арджун Сингх; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; arjun singh; అర్జున్ సింగ్ (మధ్యప్రదేశ్); അർജുൻ സിംഗ്; Arjun Singh; Arjun Singh; Arjun Singh; அர்ஜுன் சிங்; político indio; politikus, Brit India; stjórnmálamaður, Breska Indland; politikari indiarra; políticu indiu (1930–2011); индийский политик; gwleidydd, yr oruchwyliaeth Brydeinig yn India; hinduski polityk; polaiteoir Indiach; سیاست‌مدار هندی; политик, Британска Индия; politikus, Britsk-Ynje; politician indian; بھارتی سیاست دان; πολιτικός, Βρετανικές Ινδίες; politik, Britská Indie; indisk politiker; político indio; פוליטיקאי הודי; Indian politician; भारतीयराजनेतारः; ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ; మధ్య ప్రదేశ్ ముఖ్యమంత్రి, కేంద్ర మంత్రి, పంజాబ్ గవర్నరు; intialainen poliitikko; polític indi; Indian politician; политичар, Британска Индија; இந்திய அரசியல்வாதி; politico indiano; ভারতীয় রাজনীতিবিদ; personnalité politique indienne; politikan indian; India poliitik; Indiaas politicus (1930-2011); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍; քաղաքական գործիչ, Բրիտանական Հնդկաստան; პოლიტიკოსი, ბრიტანეთის ინდოეთი; भारतीय राजकारणी; siyasetçi, Britanya Hindistanı; político indiano; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; politiķis, Britu Indija; India siyaasa nira ŋun nyɛ doo; политичар, Британска Индија; politik, Britanska Indija; politikas, Britų Indija; indisk politiker; politeecian, Breetish Raj; politiker, Brittesch-Indien; indisk politikar; indisk politiker; siyasətçi, Britaniya Hindistanı; političar, Britanska Indija; politik, Britská India; indischer Politiker; індійський політик; Indian politician (1930–2011); سياسي هندي; politiker, Raj breizhveuriat; politic, Raj Britanic; Arjun Singh; अर्जुन सिंह
अर्जुन सिंग 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखनोव्हेंबर ५, इ.स. १९३०
Churhat
मृत्यू तारीखमार्च ४, इ.स. २०११
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Minister of Education
  • राज्यसभा सदस्य
  • Chief Minister of Madhya Pradesh (इ.स. १९८० इ.स. १९८५)
  • ८व्या लोकसभेचे सदस्य
  • Governor of Punjab (इ.स. १९८५ इ.स. १९८५)
  • Chief Minister of Madhya Pradesh (इ.स. १९८८ इ.स. १९८९)
वडील
  • Shiv Bahadur Singh
अपत्य
  • Ajay Singh
पुरस्कार
  • Outstanding Parliamentarian Award (इ.स. २०००)
  • Banga Bibhushan (इ.स. २०००)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3309208
व्हीआयएएफ ओळखण: 16709154
एलसीसीएन ओळखण: n2008207753
विकिडाटावर माहिती संपादित करा

अर्जुन सिंग (नोव्हेंबर ५,इ.स. १९३० - मार्च ४, इ.स. २०११) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९५७ ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९८० ते इ.स. १९८५ या काळात मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री तर मार्चइ.स. १९८५ ते नोव्हेंबर इ.स. १९८५ या काळात पंजाब राज्याचे राज्यपाल होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

ते इ.स. १९८५ मध्ये पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांच्यावर राजीव गांधी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री आणि दूरसंचारमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.ते इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून परत एकदा मध्य प्रदेश राज्यातील सतना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते जून इ.स. १९९१ ते डिसेंबर इ.स. १९९४ या काळात पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये मनुष्यबळविकासमंत्री होते. डिसेंबर इ.स. १९९४ मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष पी.व्ही. नरसिंह राव यांना जबाबदार ठरवून अर्जुन सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना बेशिस्तीच्या कारणावरून काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. पुढे मे इ.स. १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांच्याबरोबर अर्जुन सिंग यांनी तिवारी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अर्जुन सिंग-तिवारी यांचा नवा पक्ष आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही.इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतः अर्जुन सिंग यांचा सतना लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाचे फूलसिंग बरय्या यांनी पराभव केला.

पी.व्ही. नरसिंह राव काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून सप्टेंबर इ.स. १९९६ मध्ये पायउतार झाल्यानंतर अर्जुन सिंग आणि नारायण दत्त तिवारी काँग्रेस पक्षात परतले.पुढे इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुन सिंग यांचा मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सरताज सिंह यांनी पराभव केला. त्यानंतर अर्जुन सिंग राज्यसभेचे सदस्य झाले.इ.स. २००४ मध्ये काँग्रेस पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर अर्जुन सिंग यांनी मे इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ पर्यंत मनमोहन सिंह सरकारमध्ये परत एकदा मनुष्यबळविकासमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.मे इ.स. २००९ नंतर मात्र प्रकृतीच्या कारणावरून अर्जुन सिंग यांचा समावेश मंत्रीमंडळात केला गेला नाही.

संदर्भ

[संपादन]