दीना पाठक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीना पाठक (४ मार्च, इ.स. १९२२:अमरेली, गुजरात, भारत - ११ ऑक्टोबर, इ.स. २००२:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या गुजराती आणि हिंदी नाट्यअभिनेत्री तसेच चित्रपटअभिनेत्री होत्या.

या भारतातील स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या व अनेक वर्षे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन या संस्थेच्या अध्यक्षा होत्या.

यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव गांधी होते.