आंबा घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंबा घाटाचे दृश्य

आंबा घाट हा रत्‍नागिरी जिल्ह्यात असलेला व रत्‍नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सह्याद्री पर्वतातील एक महत्त्वाचा डोंगरी रस्ता आहे

इतिहास[संपादन]

पूर्वी कोकणातून कोल्हापूर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. सह्याद्री पर्वतातून पायवाटांवरून कोल्हापूरकडे जात असत. ब्रिटिश राजवटीमध्ये आंबा गावातील एका गुराख्याने हा मार्ग शोधून काढला. ब्रिटीश इंजिनिअरने या मार्गाची व्यवस्थित पाहणी करून या घाटातून रस्ता काढला. पण त्या गुराख्याला त्‍याबद्दल काहीही मोबदला मिळाला नाही, असे म्हणतात.आंबा गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

आंबा घाटातून दिसणारे खोरे

रस्ते[संपादन]

रत्‍नागिरी ते कोल्हापूर हा २०४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आंबा घाटातून जातो.