ज्योतिबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री.ज्योतिबा प्रसन्न

कोल्हापूर येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.

स्थान[संपादन]

समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्‍नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.

सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे.

पहाटे येथील वातावरण खुप प्रसन्न असते.

महत्त्व[संपादन]

दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकिर्त असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.दख्खनचा राजा श्री.जोतिबा श्री जोतिबा ,श्री कात्यायनी देवी ,नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे विशाळगड आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.या धर्मस्थळांपैकी वाडी रत्‍नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासुन सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका . डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्‍नागिरीचे गावठाण वसले असून , सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९‍ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.

वाडी रत्‍नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे.त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदिर आहे.

श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा ! पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोतिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्त्व,रज,तम गुणयुक्त आहे.

पुजा[संपादन]

मूर्ती[संपादन]

ज्योतिबाची मूर्ती

ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची बहिण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे.

अगस्ती मुनी जेव्हा दक्षिणेकडे आले तेंव्हा काही काळ रत्‍नागिरी डोंगरावर वास्तव्यास राहून तपश्र्चर्या केली आहे त्यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली आहेत त्यापैकी केदारनाथाचे मुख्य मंदिर होय. जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे.ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत जोतिबा झाले आहे. हे केदारनाथाचे रूप. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय. जोतिबा देव दख्खनचा राजा, केदारलिंंग, सौदागर, रवळनाथ या नावांनीही ओळखला जातो. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खड्‌ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे.

जोतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्या महाभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तर तिसरी पूजा बैठी असते. ती दुपारनंतर बांधण्यात येते. दर शनिवारी "श्रीं'ची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. सर्व पूजा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात.


यमाई देवी

दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औंदासूर या राक्षसाची समोरासमोर भेट झाली. निकराचे युद्ध झाले; परंतु औंदासुराचा वध मूळ माया श्री यमाईदेवीच्या हस्ते असल्याने जोतिबा देवांनी देवीस "यमाई'' अशी साद घातली. तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई ही जोतिबाची बहीण आहे.

यमाई देवीचे मुळस्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. जोतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य जोतिबा डोंगरावर असते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई म्हणजेच कृतयुगातील रेणुका आणि कट्याररुपी ऋषी जमदग्नी यांचा विवाहसोहळा दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पुर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्‍वाचे प्रतीक. "आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर' असे साकडे घालून भाविक देवीस मीठ-पीठ अर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे, कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत.

सासनकाठी मिरवणुक[संपादन]

रत्नासुरकोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवीर निवासनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा महालक्ष्मीचोपडाई देवीने त्यांना वाडी रत्‍नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्‍नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.

चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. . सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.

हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार पालक मंत्री , तीर्थक्षेत्र पाडळी (निनाम)सासन काठी १ चे पूजन करून संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान तीर्थक्षेत्र पाडळी (निनाम ) ता. जि .सातारा )या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे' ता.वाळवा जि.सांगली गावातून येणारी मध्यप्रदेश येथील ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), जोतिबा भक्त संत नावजीनाथ किवळ ता- कराड (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्त संत नावजीनाथ किवळ (जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवीजमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.

मंदिर[संपादन]

मंदिर

श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर कराडजवळच्या किवळ येथील नावजीबुवा साळुंखे-किवळकर (संत नावजीनाथ) नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या वायव्य दिशेस साडेसतरा किलोमीटर अंतरावर वाडीरत्‍नागिरी येथे दख्खनचा राजा जोतिबाचे भव्य पुरातन असे मंदिर आहे. हे तीर्थ ज्या पर्वतावर वसलेले आहे, त्या डोंगराचे मूळ नाव मौनागिरी. डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीतील असून, या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबा मंदिर हे अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार या राजाने ते बांधल्याची आख्यायिका आहे. जोतिबाचे परमभक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेखही आढळतो. आजचे देवालय हे 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूपात पुर्नचित करून बांधले. मंदिर उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. जोतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचित आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्‍वराच्या सगुण, निर्गुणाच्या भक्तीचे प्रतीक होय. या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडूनच आदीमाया चोपडाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती अष्टप्रधानांची स्थापना केलेली आहे. या शिवाय गोरक्षनाथ (आदिनाथ), रामेश्‍वर, शंखभैरव, हरिनारायण मंदिर, दत्त मंदिर आहेत. दुसरे केदारेश्वराचे देवालय.विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे.हे मंदिर इ.स.१८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले.केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पंटावा म्हणजे चोपडाई देवालय आहे.इ.स.१७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. यी तीन देवळांचा एक गट होतो.चौथे सामाश्वरीचे देवालय हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले.

सण उत्त्सव[संपादन]

जोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.

भक्त[संपादन]

जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी ससे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]