चिखलदरा
?चिखलदरा महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: किचकदरा | |
— गिरीस्थान & तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अचलपूर |
प्रांत | मेळघाट |
जिल्हा | अमरावती |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | अमरावती |
तहसील | चिखलदरा |
पंचायत समिती | चिखलदरा |
नगरपालिका | चिखलदरा |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०७२१ • MH-27 |
चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे वनविभागाचे वनपाल प्रशिक्षण केन्द्र आहे.
आख्यायिका
[संपादन]पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.
निसर्ग
[संपादन]चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही.कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात.
( चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत.)
- पंचबोलचे नाव इको पॉईंट.
- देवी पॉईंट
- नर्सरी गार्डन
- प्रॉस्पेट पॉईंट
- बेलाव्हिस्टा पॉईंट
- बेलेन्टाईन पॉईंट
- भीमकुंड
- मंकी पॉईंट
- लॉग पॉईंट
- लेन पॉईंट
- वैराट पॉईंट
- हरिकेन पॉईंट
वनप्रशिक्षण संस्था
[संपादन]१९७२ साली सुरू झालेले महाराष्ट्र वनक्षेत्रपाल महाविद्यालय येथे होते.
बाह्य दुवे
[संपादन]- चिखलदरा.ऑर्ग Archived 2022-01-17 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |