पु.ल. देशपांडे उद्यान (पुणे)
पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.
प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे, असे मानले जाते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे उद्यान (याचे जुने नाव "पुणे ओकोयामा मैत्री उद्यान" असे होते.) हे जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.
पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे.
या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येतात.
सध्या या उद्यानात अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्टींची भर घालणे चालू आहे. "मुघल उद्यान" हा त्याचाच एक भाग आहे.
माहिती व पर्यटन
[संपादन]- प्रकार - उद्यान
- क्षेत्रफळ - १० एकर
- आतील चालायच्या रस्त्याची लांबी - ९२० मीटर
- भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - वर्षभर
- उद्यानची वेळ - सकाळी सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत संध्याकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत
- विशेष - उद्यानात पायीच चालता येते.
- प्रवेश दर - ५ रुपये
- नेमके ठिकाण - http://wikimapia.org/568659/Pu-La-Deshpande-Garden
चित्रदालन
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- लोकसत्ता वृत्तपत्रामधील लेख (मराठी मजकूर)
- मायबोलीवरील लेख (मराठी मजकूर)
- सकाळ वृत्तपत्रामधील बातमी (मराठी मजकूर)
- पु.ल. देशपांडे उद्यानाविषयी "पुणे साईट" संकेतस्थळावरील लेख (इंग्लिश मजकूर)
- पु.ल. देशपांडे उद्यानाविषयी आंतर्जालात असलेला एक लेख (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |