अंबादेवी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

= == श्री अंबादेवी मंदिराचा थोडक्‍यात इतिहास. अमरावती येथील अंबादेवीच्‍या मंदिराचे अस्‍तित्‍व हजार वर्षापासून असल्‍याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून हे मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून, अतिशय पुरातन आहे. रूक्‍मिणीहरणाशी या मंदिराचा संबंध जोडला जातो.

               मोगलांनी केले मंदिर उद्ध्वस्त

1500 च्‍या कालखंडात व-हाडावर मोगलांनी कब्‍जा केला होता. तेव्‍हा अनेक नगरांची त्‍यांनी लुटालूट केली. नुकसान केली. हिंदूंची अनेक मंदिरेही त्‍यांनी उद्ध्वस्त केली. त्यामध्‍येच अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, मात्र, आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे 1660 च्‍या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे नागरिकांनी जनार्दन स्वामींच्या कार्याला हातभार लावला व मंदिराचा कायापालट होत गेला. अहिल्‍याबाई होळकर यांचेही श्री अंबादेवी मंदिराच्‍या उभारणीत मोलाचे योगदान आहे.

              पूर्णाकृती, आसनस्थ मूर्ती

अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती, आसनस्थ आहे. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. या दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या असा साज चढतो.