फेब्रुवारी २६
Appearance
<< | फेब्रुवारी २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५७ वा किंवा लीप वर्षात ५७ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३६४ - व्हॅलेन्टिनियन पहिला रोमन सम्राटपदी.
सतरावे शतक
[संपादन]- १६०६ - डच भटक्या विलेम जॅन्सन ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर उतरणारा पहिला युरोपीय ठरला.[१] [२]
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६१ - कॉलोराडोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
विसावे शतक
[संपादन]- १९३५ - जर्मनीच्या वायुसैन्य लुफ्तवाफेची पुनर्रचना.
- १९३६ - जपानच्या तरुण सैनिकांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला.
- १९५२ - युनायटेड किंग्डमने आपल्याकडे परमाणु बॉम्ब असल्याचे जाहीर केले.
- १९७० - अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियोची स्थापना.
- १९७२ - अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
- १९७६ - वि.स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- १९८४ - अमेरिकेने बैरुतमधुन माघार घेतली.
- १९८६ - फिलिपाईन्समध्ये सरकारविरुद्ध उठाव.
- १९९० - निकारागुआमध्ये निवडणुका. सॅंडिनिस्ताचा पराभव.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने कुवैतमधुन माघार घेतली.
- १९९५ - युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणूक बँक बेरिंग्स बँक कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली.
- १९९८ - परळी-वैजनाथ येथील औष्णिक विद्युतकेन्द्राने एका दिवसात १ कोटी ४७ लाख युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने बामियान येथील बुद्धाचे दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.
- २००४ - बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या मोस्तार शहराजवळ विमान कोसळून मॅसिडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष बोरिस त्राज्कोव्स्कीचा मृत्यू.
जन्म
[संपादन]- १३६१ - वेनेक्लॉस पवित्र रोमन सम्राट.
- १८०२ - व्हिक्टर ह्युगो, फ्रेंच लेखक.
- १८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस
- १८४६ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन शिकारी, सैन्याधिकारी.
- १८५१ - मोर्डेकाइ शेर्विन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६१ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
- १८६१ - नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी.
- १८६६ - डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक हर्बर्ट डाऊ.
- १८६७ - चार्ली कोव्हेन्ट्री, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कवी कलापी, गुजराती कवी.
- १८८५ - अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०३ - कैलाश नाथ वांचू, भारताचे दहावे सरन्यायाधीश.
- १९०८ - लीला मुजुमदार, इंग्लिश लेखिका.
- १९०९ - तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९२२ - मनमोहन कृष्ण, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९२२ - बिल जॉन्स्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - एव्हर्टन वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - फॅट्स डॉमिनो, अमेरिकन संगीतकार.
- १९३२ - जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार.
- १९३७ - मनमोहन देसाई, हिंदी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९४१ - कीथ थॉमसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - मृणाल पांडे, भारतीय पत्रकार व साहित्यिक.
- १९५० - हेलन क्लार्क, न्यू झीलंडची पंतप्रधान.
- १९५४ - मायकेल बोल्टन, अमेरिकन संगीतकार.
- १९५४ - रेसेप तय्यिप एर्दोवान, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९७१ - नोएल डेव्हिड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११५४ - रॉजर दुसरा, सिसिलीचा राजा.
- १२६६ - मॅन्फ्रेड, सिसिलीचा राजा.
- १५२५ - कुआह्टेमॉक, ऍझटेक राजा.
- १५७७ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
- १७१२ - बहादुर शाह प्रथम, दिल्लीचा मोगल सम्राट.
- १८८६ - नर्मदाशंकर दवे ऊर्फ कवी नर्मद, गुजराती कवी आणि समाजसुधारक.
- १८८७ - आनंदी गोपाळ जोशी, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर.
- १९०३ - रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग, अमेरिकन संशोधक.
- १९६१ - मोहम्मद पाचवा, मोरोक्कोचा राजा.
- १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.
- १९६९ - लेवी एश्कोल, इस्रायेलचा पंतप्रधान.
- २००० - बा. म. तथा रावसाहेब गोगटे, भारतीय उद्योजक.
- २००३ - राम वाईरकर, मराठी व्यंगचित्रकार.
- २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
- २००४ - बोरिस त्रायकोव्स्की, मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१० - चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, समाजसुधारक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- मुक्ती दिन - कुवैत
- राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Norman Davies, Beneath Another Sky: A Global Journey Into History (Penguin Books, 2017)
- ^ McHugh, Evan (2006). 1606: An Epic Adventure. Sydney: University of New South Wales Press. p. 20. ISBN 978-0-86840-866-8.
फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - (फेब्रुवारी महिना)