जून ३
Appearance
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५४ वा किंवा लीप वर्षात १५५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]- ३५० - नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
अकरावे शतक
[संपादन]- १०९८ - पहिली क्रुसेड - आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी ॲंटियोक शहर जिंकले.
सोळावे शतक
[संपादन]- १५३९ - एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
सतरावे शतक
[संपादन]- १६६५ - जेम्स स्टुअर्टने नेदरलॅंड्सच्या आरमाराला हरवले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
- १८८९ - कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
विसावे शतक
[संपादन]- १९३७ - ड्यूक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
- १९४० - डंकर्कची लढाई - जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
- १९४३ - झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणाऱ्या लोकांना बडवून काढले.
- १९६२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.
- १९६३ - नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.
- १९६८ - अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
- १९६९ - व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
- १९७३ - सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.
- १९७९ - मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
- १९८४ - ऑपरेशन ब्ल्यु स्टार - भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
- १९८९ - थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
- १९९१ - जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
- १९९८ - जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरून घसरली. १०१ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - सर्बिया आणि मॉंटेनिग्रोचे विघटन. मॉंटेनिग्रोला स्वातंत्र्य.
जन्म
[संपादन]- १८९० - बाबूराव पेंटर, प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
- १८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्द गांधी.
मृत्यू
[संपादन]- १९७७ - आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
- २००० - डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
- २०१० - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)