एअर फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअर फ्रान्सचे एरबस ए-३८० विमान

एअर फ्रान्स (इंग्लिश: Air France) ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एअर फ्रान्सचे मुख्यालय पॅरिस शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूककेंद्र (हब) पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. एअर फ्रान्स जगातील ९१ देशांमधील १५४ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. भारतामधील मुंबई, दिल्लीबेंगलोर ह्या तीन महानगरांमध्ये एअर फ्रान्सची सेवा सध्या चालू आहे. ही एअर फ्रान्स-KLM संघाची साहाय्यक विमान कंपनी आहे आणि स्काय टीम ग्लोबल एअर लाइन यांच्याशी सलोखा निर्माण करण्याची मुहुर्तमेढ रोवणारी विमान कंपनी आहे.

एअर फ्रान्स ही स्कायटीमची सदस्या आहे.[१]

इतिहास[संपादन]

ही विमान कंपनी दि.७ ऑक्टोबर १९३३ रोजी एअर ओरियंट, एअर युनियन, कोम्पग्नी जनरल एरोपोस्टल, कोम्पग्नी इंटरनॅशनल द नॅव्हिगेशन एरिएंने (CIDNA), आणि सोकीत जनरल द ट्रान्सपोर्ट ऐरिएंस (SGTA) या विमान कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन स्थापन झाली.[२] या कंपनीपैकी SGTA ही कंपनी लीगनेस एरिएंनेस फरमान यांनी सन १९१९ मध्ये फ्रान्समध्ये व्यावसायिक प्रवासी विमान सेवा कंपनी सुरू केली. सन १९३६ मध्ये एअर फ्रान्सने पोतेज ६२ एअरक्राफ्ट मध्ये फ्रान्स मध्येच बनवलेल्या ट्विन इंजिनचा वापर केला आणि १४ ते १६ प्रवासी सामावतील अशा दोन केबिनांची व्यवस्था केली.

दि.२६ जून १९४५ रोजी एअर फ्रान्सचे विमान प्रवासी कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले. दि.२९ डिसेंबर १९४५ रोजी फ्रान्स सरकारने देशातील सर्व विमान वाहतूक कंपन्यांचे व्यवस्थापन एअर फ्रान्सकडे सुपूर्द केले.इं सन १९४६ मध्ये एअर फ्रान्सने त्यांच्या पहिल्या विमान सहकारी सेवकाची नेमणूक केला. त्याच वर्षी पॅरिसमध्ये मध्यवर्ती ठिकाणी लेस इनवलीडेस येथे पहिले एअर टर्मिनल चालू केले. हे पॅरिस ले बौर्गेट एअर फोर्ट, एअर फ्रान्सच्या पहिल्या उड्डाणाचे ठिकाण आणि इंजिनिअरिंग केंद्राशी चारचाकी वाहनाच्या साहाय्याने जोडले.(??) त्यावेळी या विमान कंपनीचा पसारा १६०००० किलोमीटरचा होता. हा जगात सर्वात लांब पल्ल्याचा झाला होता.

१ जानेवारी १९४६ रोजी सोकीट नॅशनल एअर फ्रान्स (SNAF) चालू झाले.

१ जुलै १९४६ रोजी एअर फ्रान्सची पॅरिस ते न्यूयॉर्क व्हाया शन्नोन आणि गंडेर या मार्गाने डायरेक्ट विमान सेवा सुरू झाली.[३] हे अंतर डग्लस DC-4 पिस्टोन – एंजिनचे विमान फक्त २० तासात पार करू लागले. सप्टेंबर १९४७ मध्ये एअर फ्रान्सचे नेटवर्क न्यूयॉर्कच्या पूर्वेला फोर्ट डी फ्रान्स आणि ब्यूनोस एअर ते शांघायपर्यंत पोहचले.

विमान ताफा[संपादन]

सन १९४८ मध्ये एअर फ्रान्स १३० विमाने व्यवसायात वापरत होते. हा विमानताफा जगातील सर्वात मोठा होता.[४] सन १९४७ ते सन १९६५ दरम्यान ही विमान कंपनी लॉकहीड कॉन्स्टलेशन्स प्रवाशी आणि मालवाहातूक जगभर करीत होती.[५] फ्रान्स सरकारने १९४६ आणि १९४८ मध्ये दोन खाजगी विमान कंपन्यांना व्यवसायाची परवानगी दिली.

कायदेशीर सहभागीदारी करार[संपादन]

फ्रान्स एअर लाइनने खालील कंपन्यांबरोबर विमान व्यवसायाचे कायदेशीर करार केले आहेत.[६]

परदेशातील कार्यालये[संपादन]

एअर फ्रान्सने न्यूयॉर्क सिटीच्या मिडटाऊन मॅनहॅटन भागामधील १२५ वेस्ट ५५ व्या मार्गावरील इमारतीत येथे सन १९९१ मध्ये भाड्याने जागा घेऊन कार्यालय थाटलेले आहे. पूर्वी येथे एअर फ्रान्सचे तिकिट ऑफिस होते. युनायटेड किंग्डम आणि आयर्लंड येथील कामकाजासाठी हाततोन क्रॉस जवळ प्लेसमन हाऊस येथे कार्यालय आहे.[७]

इतर कार्यालये[संपादन]

एर फ्रान्सचे वैमानिक केंद्र चार्ल्स दि गॉल विमानतळावर आहे. पॅरिसमध्ये या कंपनीचे स्वतःचे लसीकरण केन्द्र आहे.[८] आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी येथून लस दिली जाते. याला ISO ची मान्यता आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "एअर फ्रान्स - स्कायटीम सदस्या". स्कायटीम.कॉम. ८ नोव्हेंबर २०१६. 
  2. "एअर फ्रान्सचा इतिहास". मूसीएअरफ्रान्स.ऑर्ग. ८ ऑगस्ट २०१६. 
  3. "एअर फ्रान्सच्या विमान सेवेबद्दल". क्लियरट्रिप.कॉम. ८ नोव्हेंबर २०१६. 
  4. "एअर फ्रान्स - विमान संचाचा तपशील आणि इतिहास". प्लान्सपॉटर्स.नेट. ८ नोव्हेंबर २०१६. 
  5. "दी लॉकहीड कॉन्स्टेलेशन सीरीज". गेटटेक्स्टबुक्स.कॉम. 
  6. "एअर फ्रान्सची व्यावसायिक ओळख". सेंटरफॉरएव्हिएशन.कॉम. ८ नोव्हेंबर २०१६. 
  7. "एअर फ्रान्सने लंडन येथे नवीन कार्यालय उघडले. प्रकाशक=वेब.आर्काइव्ह.ऑर्ग". ६ जुलै २००६. 
  8. "लस केंद्र". कॉर्पोरेट.एअरफ्रान्स.कॉम. ८ नोव्हेंबर २०१६.