मे ६
(६ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
मे ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२६ वा किंवा लीप वर्षात १२७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सोळावे शतक
- १५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
सतरावे शतक
- १६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
अठरावे शतक
- १७३९ : चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली वसई मोहीम फत्ते; उत्तर कोकण मराठेशाहीत.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
- १८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
- १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले.
विसावे शतक[संपादन]
- १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
- १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
- १९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
- १९८४ : कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला.
- १९९४: इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
- १९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
- १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
- २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.
जन्म[संपादन]
- १२३६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.
- १५०२ - होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७१४ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७५५ - नेथन हेल, अमेरिकन लेखक व स्वातंत्र्यसैनिक.
- १७९९ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन कवी.
- १८५० - कार्ल फर्डिनांड ब्रॉन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड
- १८६१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८६८ - रॉबर्ट फाल्कन स्कॉट, इंग्लिश शोधक.
- १८७२ - थॉमस मान, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८९७ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- १९०१ - सुकर्णो, इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ - कर्क कर्कोरियन, अमेरिकन उद्योगपती.
- १९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी
- १९३३ - हाइनरिक रोह्रर, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३४ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री
- १९४३ - रिचर्ड स्मॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर
- १९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन
- १९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर
- १९५६ - ब्यॉर्न बोर्ग, टेनिसपटू.
- १९५७ - माइक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१-अभिनेता जॉर्ज क्लूनी
- १९८३-ऑलिंपिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग
मृत्यू[संपादन]
- ६८० - खलिफा म्वाइयाह्.
- १५८९: अकबराच्या दरबारातील एक नवरत्न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन
- १८६२: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)
- १९२२ - सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज.
- १९४६: भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. .
- १९५२ -इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी.
- १९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
- १९९५: प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी
- १९९९: पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे
- २०००- अभिनेत्री निगार सुलताना
- २००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर
- २०१७-सतारवादक उस्ताद रईस खां
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- हॉलोकॉस्ट स्मृति दिन - इस्राइल
- International No Diet Day
- आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर मे ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)