टोनी ब्लेअर
टोनी ब्लेअर | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २ मे १९९७ – २७ जून २००७ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
उपपंतप्रधान | जॉन प्रेस्कॉट |
मागील | जॉन मेजर |
पुढील | गॉर्डन ब्राउन |
जन्म | ६ मे, १९५३ एडिनबरा, स्कॉटलंड |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
ॲंथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर (इंग्लिश: Anthony Charles Lynton Blair; ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने चालू केलेल्या अफगाणिस्तान व इराक युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला बुशचा चमचा ही उपाधी दिली होती.
१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राउनची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल-पॅलेस्टाइन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |