आयफेल टॉवर

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search
आयफेल टॉवर
Tour Eiffel - 20150801 15h30 (10621).jpg

आयफेल टॉवर (फ्रेंच: Tour Eiffel) ही १८८९ साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खूण मानली जाते.

आयफेल टॉवर ३२४ मीटर (१,०६३ फूट) उंच आहे व त्याला तीन मजले आहेत. गुस्ताव्ह आयफेल ह्या फ्रेंच वास्तूशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी १८,०३८ अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरुन आयफेल टॉवर बांधला.

आयफेल टॉवर पॅरिसमधील सर्वांत उंच इमारत आहे व १८८९ ते १९३० ह्या काळादरम्यान जगातील सर्वांत उंच इमारत होती. आयफेल टॉवर हे जगातील सर्वांत लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.

इतिहास[edit]

जुलै १८८८ साली आयफेल टॉवर बांधकाम होत असताना

१८८७ ते १८८९ या काळात हे बांधकाम करण्यात आले. मार्च ३१ १८८९ रोजी त्याचे उद्घाटन झाले व ६ मे १८८९ रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला.

रचना[edit]

आयफेल टॉवरमधील धातूंचे वजन ७,३०० टन आहे.

टिपा[edit]

[१][२][३][४][५][६][७][८][९]

  1. ^ "Identity card of the Eiffel Tower" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2009-12-31. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  2. ^ "The documents" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  3. ^ "The structure of the Eiffel Tower and its evolution" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  4. ^ "Chronology of the main construction periods" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  5. ^ "A few statistics" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  6. ^ "Dictionary of technical terms" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  7. ^ (इंग्रजी) http://www.tour-eiffel.fr/teiffel/uk/documentation/pdf/about_the%20Eiffel_Tower.pdf?id=4_11
  8. ^ "The Tower operating company" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 
  9. ^ "The industrial maintenance of the Tower" ((इंग्रजी) मजकूर). Tour-eiffel.fr. 2010-05-24 रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[edit]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: