Jump to content

आदिलशाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आदिलशहा या पानावरून पुनर्निर्देशित)
ಬಿಜಾಪುರ ಸಲ್ತನತ್
आदिलशाही सल्तनत
بیجاپور سلطنت
px

१४९० - १६८६
राजधानी विजापूर
राजे १४९० - १५१०: युसूफ आदिलशाह
भाषा दख्खनी
क्षेत्रफळ वर्ग किमी

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला.

आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारून आदिलशाहीची स्थापना केली.

आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.