फेब्रुवारी २६
(२६ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
<< | फेब्रुवारी २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५७ वा किंवा लीप वर्षात ५७ वा दिवस असतो.
ठळक घटना[संपादन]
चौथे शतक[संपादन]
- ३६४ - व्हॅलेन्टिनियन पहिला रोमन सम्राटपदी.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८६१ - कॉलोराडोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
विसावे शतक[संपादन]
- १९३५ - जर्मनीच्या वायुसैन्य लुफ्तवाफेची पुनर्रचना.
- १९३६ - जपानच्या तरुण सैनिकांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला.
- १९५२ - युनायटेड किंग्डमने आपल्याकडे परमाणु बॉम्ब असल्याचे जाहीर केले.
- १९७० - अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियोची स्थापना.
- १९७२ - अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
- १९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- १९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
- १९८४ - अमेरिकेने बैरुतमधुन माघार घेतली.
- १९८६ - फिलिपाईन्समध्ये सरकारविरुद्ध उठाव.
- १९९० - निकारागुआमध्ये निवडणुका. सॅंडिनिस्ताचा पराभव.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने कुवैतमधुन माघार घेतली.
- १९९५ - युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणूक बॅंक बेरिंग्स बॅंक कोसळली. काही दिवसांपूर्वी बॅंकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बॅंकेवर ही पाळी आली.
- १९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
- १९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
- १९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने बामियान येथील बुद्धाचे दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.
- २००४ - बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या मोस्तार शहराजवळ विमान कोसळून मॅसिडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष बोरिस त्राज्कोव्स्कीचा मृत्यू.
जन्म[संपादन]
- १३६१ - वेनेक्लॉस पवित्र रोमन सम्राट.
- १८०२ - व्हिक्टर ह्युगो, फ्रेंच लेखक.
- १८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस
- १८४६ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन शिकारी, सैन्याधिकारी.
- १८५१ - मोर्डेकाइ शेर्विन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६१ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
- १८६१ - नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी.
- १८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ
- १८६७ - चार्ली कोव्हेन्ट्री, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि
- १८८५ - अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८८७ - बेनेगल नरसिंह राव - एक भारतीय प्रशासनिक अधिकारी, विधिवेत्ता, राजनयिक आणि राजनीतिज्ञ
- १९०३ - कैलाश नाथ वांचू - भारताचे दहावे मुख्य न्यायाधीश
- १९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार
- १९०९ - तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण
- १९२२ - बिल जॉन्स्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - एव्हर्टन वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - फॅट्स डॉमिनो, अमेरिकन संगीतकार.
- १९३२ - जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार.
- १९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई
- १९४१ - कीथ थॉमसन, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - मृणाल पाण्डे, पत्रकार व साहित्यकार
- १९५० - हेलन क्लार्क, न्यू झीलॅंडची पंतप्रधान.
- १९५४ - मायकेल बोल्टन, अमेरिकन संगीतकार.
- १९५४ - रेसेप तय्यिप एर्दोगान, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९७१ - नोएल डेव्हिड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- ११५४ - रॉजर दुसरा, सिसिलीचा राजा.
- १२६६ - मॅन्फ्रेड, सिसिलीचा राजा.
- १५२५ - कुआह्टेमॉक, ऍझटेक राजा.
- १५७७ - एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
- १७१२ - बहादुर शाह प्रथम - दिल्लीचा ७वा मुग़ल बादशाह
- १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद
- १८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी
- १९०३ - रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग, अमेरिकन संशोधक.
- १९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर
- १९६१ - मोहम्मद पाचवा, मोरोक्कोचा राजा.
- १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.
- १९६९ - लेवी एश्कोल, इस्रायेलचा पंतप्रधान.
- २०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे
- २००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर
- २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
- २००४ - बोरिस त्रायकोव्स्की, मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्किन
- २०१०: समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- मुक्ती दिन - कुवैत
- राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - (फेब्रुवारी महिना)