सप्टेंबर २४
Appearance
(२४ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६७ वा किंवा लीप वर्षात २६८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सातवे शतक
[संपादन]- ६२२ - मोहम्मद पैगंबरने मक्केहून मदिनाची हिजरत पूर्ण केली.
सतरावे शतक
[संपादन]- १६६४ - नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे न्यू यॉर्क) इंग्लंडच्या हवाली केले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४१ - ब्रुनेईने सारावाक इंग्लंडच्या हवाली केले.
- १८६९ - जे गूल्ड आणि जेम्स फिस्कने संगनमत करून रचलेला सोन्याचा बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.
- १८७३ - महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- १८९० - मोर्मोन चर्चने बहुपत्नीत्त्वाची प्रथा अमान्य केली.
विसावे शतक
[संपादन]- १९०३ - एडमंड बार्टनने राजीनामा दिल्यावर आल्फ्रेड डीकिन ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९४८ - हॉन्डा मोटर कंपनीची स्थापना.
- १९५० - न्यू इंग्लंड आणि कॅनडात लागलेल्या वणव्यांनी त्या भागातील आकाश झाकोळून टाकले. काही दिवस सूर्यप्रकाश सुद्धा जमीनीवर पोचू शकत नव्हता.
- १९५७ - वर्णभेदाचा पुरस्कार करणाऱ्या जमावाविरुद्ध लिटल रॉक, आर्कान्सा येथे १०१वी एरबॉर्न डिव्हिजन तैनात.
- १९६२ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला श्यामवर्णीय विद्यार्थी जेम्स मेरेडिथला दाखल करून घेण्यास फर्मावले.
- १९७३ - गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - हरिकेन रिटा हे चक्रीवादळ अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या बोमॉँट शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉँट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य लुईझियानामध्ये अतोनात नुकसान केले.
- २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
- २०१३ - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
- २०१५ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.
जन्म
[संपादन]- १५ - व्हिटेलियस, रोमन सम्राट.
- १९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.
- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.
मृत्यू
[संपादन]- ३६६- पोप लायबेरियस.
- १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
- २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर महिना