न्यू इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकेच्या नकाशात न्यू इंग्लंडचे स्थान

न्यू इंग्लंड हा अमेरिकेतील अति-ईशान्येकडील एक भौगोलिक प्रदेश आहे. न्यू इंग्लंड प्रदेशात सध्याची मॅसेच्युसेट्स, मेन, व्हरमॉंट, न्यू हॅम्पशायर, कनेटिकटऱ्होड आयलंड ही राज्ये येतात.

न्यू इंग्लंड ही अमेरिकेतील ब्रिटिशांची सर्वात जुनी वसाहत आहे. ब्रिटिश खलाशी येथे १६२० सालापासुन वसले आहेत. न्यू इंग्लंडमध्ये अमेरिकन साहित्य व तत्त्वज्ञानाचे पहिले घडे पडले, तसेच अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीची सुरुवात देखील येथेच झाली. त्यामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक इतिहासात न्यू इंग्लंडला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

न्यू इंग्लंड प्रदेशाचे क्षेत्रफळ १,८६,४५९ वर्ग किमी तर एकूण लोकसंख्या १,४३,०३,५४२ आहे.

मोठी शहरे[संपादन]