नागपूर विभाग
Appearance
नागपूर विभाग (पूर्व विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ या नावानेही ओळखला जातो.
चतुःसीमा
[संपादन]या विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ), पूर्वेस छत्तीसगढ राज्य, उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस तेलंगणा ही राज्ये आहेत.
थोडक्यात माहिती
[संपादन]- क्षेत्रफळ - ५१,३३६ कि. मी.
- लोकसंख्या (२००१ची गणना) - १,०६,६५,९३९
- जिल्हे - नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, वर्धा जिल्हा
- साक्षरता - ७५.९० %
- ओलिताखालील जमीन : ४,८२० कि. मी.